विज्ञान अध्यापक मंडळ घेणार गणित शिक्षकांची कार्यशाळा

0

वरणगाव : सध्या लॉक डाऊन सुरू असून शिक्षक विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम तसेच निकालाच्या कामात गुंतलेले आहेत परंतु शिक्षकांसाठी या सुट्टीचा उपयोग करून घेण्यासाठी गणित व विज्ञान विषयाची कार्यशाळा आयोजित करणार आहे. जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाची बैठक झुम अ‍ॅपद्वारे झाली. यावेळी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे, उपाध्यक्ष बी.बी.जोगी, सचिव सुनील वानखेडे, बोदवड तालुका समन्वयक वनिता अग्रवाल, धरणगाव तालुका समन्वयक बी.आर.महाजन आदींनी या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी लॉक डाऊनचा उपयोग करून राजकोट येथील ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लबचे अध्यक्ष चंद्रमौली जोशी हे शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधून दोन दिवसाची कार्य शाळा घेणार आहेत. या कार्यशाळेमध्ये गणिताच्या विविध क्रिया सूत्र सोप्या पद्धतीने शिकवणे, गणिती सूत्र प्रयोगातून मांडणी करणे यासह इतर गणितातील सोपे ट्रिक्स शिक्षकांना देणार आहेत .

ऑनलाईन अ‍ॅक्टीव्हीटी राबवणार
लवकरच इजिल्ह्यातील विद्यार्थ्यांची देखील कार्यशाळा त्यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे यासाठी जिल्हाभरातील शंभर शिक्षकांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विज्ञान प्रसार, नवी दिल्ली यांच्यावतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावरील विविध अ‍ॅक्टिव्हिटी करण्यात येणार आहे यासाठी तालुका समन्वयक यांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटी राबवण्यात येणार आहे यातील बेस्ट अ‍ॅक्टिव्हिटीला प्रमाणपत्र व बक्षीस देऊन जळगाव जिल्हा अध्यापक मंडळाच्या वतीने गौरव करण्याचे ठरले.

राष्ट्रीय बालविज्ञान परीषदेत उत्कृष्ट शोध निबंधाचे होणार सादरीकरण
पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये राष्ट्रीय बाल विज्ञान परीषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शोधनिबंध तयार करण्याबाबत व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप व झूम अ‍ॅपच्या माध्यमातून माहिती देणार आहे तसेच आपल्या परीसरातील समस्या व त्यावरील निराकारण विद्यार्थी शोध घेऊन निष्कर्ष व अनुमान शोध निबंधातून मानातील उत्कृष्ट शोधनिबंधाचे सादरीकरण राष्ट्रीय बालविज्ञान परीषदेत करण्यासाठी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे जिल्हा समन्वयक सुनील वानखेडे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हास्तरीय कार्यशाळेसाठी आयोजन व शिक्षकांच्या निवडीचे काम तसेच ऑनलाईन कार्यशाळेसाठी तांत्रिक बाजू बघण्याचे काम विज्ञान अध्यापक मंडळाचे रावेर तालुका समन्वयक एस.डी.पाटील करणार आहेत

सुट्ट्यांचा उपयोग गणित व विज्ञानाच्या ऍक्टिव्हिटी शिकण्यासाठी
सध्या शाळा बंद असून लॉक डाऊन असल्याने शिक्षक विद्यार्थी घरीच बसून आहे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता लॉक डाऊन लवकर उठणे शक्य नाही परंतु विद्यार्थ्यांचा या सुट्ट्यांमध्ये सकारात्मक उपयोग करून घेण्यासाठी त्यांचे व शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात येणार असल्याचे जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे म्हणाले.