काय आहे विज्ञान दिन? 28फेब्रुवारी 1930 मध्ये डॉ चन्द्रशेखर वेंकट रमन यांच्या भौतिकी शोधाला नोबेल पुरस्कार मिळाला म्हणून त्याची आठवण आणि सेलेब्रीशन इतकच का?
खेळ, मनोरंजन, जातीभेद आणि राजकारणात गुरफटलेल्याया देशाला विज्ञानदिन हा नक्कीच वेलेनटइन डे इतका मोठा किंवाक्रिकेटच्या फायनल सामान्य इतका तरी मोठा वाटतो का हा मोठा प्रश्न आहे. असू द्यात …..भारत हा वैज्ञानिक योगादानात जगात २१ व्या स्थानावर आहे..
आपल्या भारताची वैज्ञानीक पार्श्वभूमी फार-फार जुनी आहे. मनःशक्ती, आत्मज्ञान आणि अंतर्ज्ञान यांच्या जोरावर सर्वात शुद्ध ज्ञान म्हणजेच ‘विज्ञान’ जगासमोर मांडणारा सर्वात प्राचीन देश कोणता असेल तर तो भारतच.ग्रहांच्या स्थितीवर आधारती ज्योतिषशास्त्र आसो, किंवाहजारो वनस्पतीचा उपयोग करून आजारांवर मात करणारे आयुर्वेद असोत किंवा black होल (कृष्ण विवर ), nuke wepons (आण्विक अस्त्र / ब्रह्म अस्त्र ) विमानयाबद्दल माहिती देणारे पुराने असोत, मेडीटेशन योगा पासून ड्राय बॅटरी पर्यंत व विषाचा शोध घेणाऱ्या स्फाटीकांपासून आणि यासोबत बरीच काही माहिती देणारेपुराण आणि वेद आपल्याकडे आहे.
गणपतीचे अथर्वशीर्ष जरी हाती घेतले तरी त्यातही त्यात “त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी” असा उल्लेख आहेच, पण जम्बूद्वीप(आजचा आशिया खंड) पासून भारतवर्ष;भारतवर्ष पासूनभारत; भारत पासून हिंदुस्थान; आणि हिंदुस्थानापासून इंडिया यागतिशीलप्रक्रियेत लोकांमधील विज्ञान मात्र गतिहीन झाले आणिआज भारताची ही पार्श्वभूमी न तपासताच लोक विचारतात की, “भारतात शोध का लागत नाहीत ? विज्ञानात योगदान किती? ”
माझ्या मुला / मुलीला सरकारी नौकरीच लागावी अशी अपेक्षा असणारे 80% पालक या देशात आहेत, तरुण तशीच मानसिकता बनवत आहेत….. कम्फर्ट झोन मध्ये विज्ञान समोर येत नाही आणिविकसितही होत नाही.भारतातफार कमी शोध लागण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
असं असलं तरीही १८ व्या शतकापासूनते १९व्या शकतात पर्यंत झालेलेल्या विज्ञानिक घडामोडीच २० व्या शतकात जमेच्या बाजू ठरत आहेत… डॉ. रमण , डॉ. होमी जहांगीर भाभा, रामानुजन,सत्येंद्र बोस, जगदीश बोस, विक्रम साराभाई, रे, भटनागर, सहानी, रामन्चन्द्रण, कलाम आणि इत्यादी…. आज भारतात जी काही प्रगती आहे ती यांच्या भूतकाळातील योगदानामुळेच.
आजनारळीकर, काकोडकर, माशेलकर, कस्तुरीरंगन, भोजे व इतर अनेक वैज्ञानिकानी धुरा सांभाळली आहे.
पण आमच्या देशाचे चित्र निराळे आहे. इथे क्रिकेटर 4G गतीने, राजकारणी 3G गतीने,कलाकार2G गतीनेतर वैज्ञानिक हे फक्त 2Kbps च्या गतीने तयार होत आहेत.स्वामी विवेकानंद म्हणायचे,“देशाच्या तरुणांच्या जिभेवर कोणाचे नाव ते सांगा, मी तुम्हाला त्या देशाचे भविष्य सांगतो.” तुम्हीपालक म्हणून हालेख वाचत असाल तर विचारा तुमच्या मुलांना की त्यांचे आदर्श कोण आहेत, चित्र स्पष्ट डोळ्यासमोर उभे राहील.नट-नट्यांची आणि क्रिकेटरांची चित्र घराघरात मात्र विज्ञानिकांची चित्र फक्त प्रयोग शाळेत हे चित्र जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत भारतातील वैज्ञानिक प्रगतीचे चित्र बदलणार नाही व जाणीव करून देणारा दिवस म्हणजे विज्ञान दिवस.
राष्ट्रीय विज्ञानदिना मागचा आपण हा हेतू लक्षात घेतला पाहिजे की विज्ञानाचा उपयोग फक्त शोध लावण्यासाठी आहे असं नाही. विज्ञान म्हणजे शुद्ध ज्ञान. आपल्या आसपास असलेल्या गोष्टीचे मूळरूप काय, भाकडकाय नि वास्तव काय व त्याचे फायदे आणि उपयोग काय याची माहिती शोधाभ्यास करून जगासमोर मांडणे म्हणजेच विज्ञान म्हणजेच शुद्ध ज्ञान. अज्ञान माणसाला अंधविश्वासी आणि अपरिपक्व बनवते तर शुद्ध ज्ञान (विज्ञान) माणसाला वास्तविक, तर्क्संपन्न, विवेकशील आणिविचारशील बनवते.
मुळात विज्ञान हे माणसाच्या अंतर्ज्ञानात आहे. मनात निर्माण झालेला प्रश्न आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी सुरु झालेली प्रक्रिया ही स्व मधूनच सुरु होते आणि मग त्याला भौतिकरूप प्राप्त होते.
विज्ञान म्हंटल की आस्तिक-नास्तिक हा प्रकार येतोच आणि त्यावरची अर्थशून्य चर्चा देखील. काही वर्षांपूर्वी एक मोठा प्रयोग झाला तो म्हणजे LHC लार्ज हायड्रोन कोलायडर. विश्वाची निर्मिती कशी झाली याचाअंदाज घेण्यासाठी. प्रयोग संपला हातात लागले फक्त काही ‘कण’ आणि या कणाला नाव देण्यात आलं गॉड पार्टिकल( दैवीय कण).म्हणूनएक वास्तविकता आपण जाणली आणि जपली पाहिजे, ती म्हणजे विज्ञान म्हणजे सर्वकाही नाही आणि सर्व काही विज्ञान नाही.
राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागचा मूळ हेतू आपण असा घेतला पाहिजे की आपल्या सर्वांमध्ये काही प्रमाणात विज्ञान आहे व त्याचा शोध घेणे आवश्यक आहे.शुद्ध ज्ञान घेणे आवश्यक आहे आणिते शेअर करणे देखील आवश्यक आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिन निमिताने ही गोष्ट नमूद करावी वाटते की चांगला वैज्ञानिक तोच बनू शकतो ज्याच्या कडे चांगले आध्यात्मिक ज्ञान आहे.17 व्या शकतातील वैज्ञानिकांपासूनते आजपर्यंतच्यावैज्ञानिकांची जीवनी वाचल्यावर हेच लक्षात येते की त्यांनी मिळवलेल्या वैज्ञानिक यशामागे आध्यत्मिक ज्ञानाचे मोठे योगदान आहे. तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना वैज्ञानिक बनायचे असेल तर अध्यात्माशी नाळ जोडणे आवश्यक आहे. विज्ञान आणि आध्यात्म हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीचा उपयोग हा शोधघेण्यासाठी आणि शुद्ध ज्ञान जगासमोर आणण्यासाठीच आहे. अध्यात्मही शोध घेण्याचा अभौतिक मार्ग आहे तर विज्ञान हा भौतिक मार्ग आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिन हा फार मोठा दिन, पण या दिनाचे लक्ष्यकाय?
१. लोकांच्या दैनिक जीवनात वैज्ञानिक अनुप्रयोगाचे महत्व पटवून देणे
२. मानव कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्वघडामोडी, प्रयत्नआणि उपलब्धियांचेप्रदर्शन करने.
३. विज्ञान विकासासाठीसर्व मुद्यांवर चर्चा करणे आणि नवीन प्रौद्योगिकी लागू करणे.
४. देशातील नववैज्ञानिकांना संधी देणे
५. विज्ञान आणि तंत्रज्ञानाला बढावा देणे हे प्रमुख उद्देश.
खरं तर जन्मल्यापासून आपण विज्ञाना सोबत असतोच आणि त्याची नियमित जाणीव व्हावी म्हणून आजचा विशेष दिन.मुळात जे काही अपरिचित आहे त्या गोष्टीशी परिचित होणे. मागील शतकामध्येवैज्ञानिक समुदायाने असाधारण विज्ञान जगसोमार आणले आहे आणि आपल्यासाठीतिसऱ्या डोळ्याचे काम करत आहे. खरं तर ज्ञान, बुद्धी हाच मानवाचा तिसरा डोळा पण, त्या तिसऱ्या डोळ्याला मोठा दृष्टीकोन देण्याचे काम निर्मित झालेले विज्ञान देत असते व त्याच्या सहायाने सृष्टी आणि सृष्टीमधील गोष्टी जाणण्यास, समजण्यास आणि शिकण्यास मोठी मदत होत आहे. हेच लक्षात ठेवण्यासाठी विज्ञान दिन. शिकणे, शोध घेणे, शोधून मिळालेल्या ज्ञानातून अजून शिकत राहणे हेच विज्ञानाचे चक्र म्हणून म्हणतो विज्ञान शिकता शिकता, विज्ञान जगता आले पाहिजे. डोळे उघडून, मेंदू वापरून, सर्वांना बघता आले पाहिजे.शिकलेले विज्ञान जगणे म्हणजे, खरे विज्ञान शिकणे होय !
निलेश गोरे
ट्रेनर आणि सायकॉलॉजीकल काउंसलर,
वेलनेस फाऊंडेशन, भुसावळ.
9922851678