वरुळ । शिरपूर तालुक्यातील वरुळ येथील दिपकभाई इंग्लिश मीडियम स्कूल येथे मराठीे नव वर्षाआरंभी वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम ‘दिपरंग’चे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी भामपूरचे निवृत्त मुख्याध्यापक शांतीलाल पाटील होते. याप्रसंगी परिसरातील विद्यार्थ्याची शिक्षणाची गरज ओळखून संस्थ्येचे संचालक प्रमोदभाई पटेल यांनी जून 2018 पासून कॉलेज स्थापन करण्याची इच्छा व्यक्त करून लागलीच फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
परिसरातील सुदाम तात्या भालेकर,शिवाजी धनगर, केंद्र प्रमुख एम.एम. सूर्यवंशी, कांशीराम कोळी,भटाणे शाळेचे मुख्यद्यापक मराठे सर,तर्हाड कसबे शाळेचे मुख्याध्यापक डी. एन.धनराज,अंतुर्ली चे दिनेश कोळी,डॉ. मराठे, भामपूरचे सरपंच पप्पू पाटील,शिरपूरचे नगरसेवक नाना भोई, ज्ञानेश्वर पाटील, महेश पाटील, प्राचार्य योगेश पाटील आदी जेष्ठ मान्यवर उपस्थितीत होते. लहान लहान विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर ठेका धरून प्रेक्षकांची मने जिंकली. सुत्रसंचालन सादिक सर यांनी केले तर यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.