विज्ञान नाट्योत्सवात श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय प्रथम

0

नवापूर । राष्ट्रीय संग्रहालय परिषद, नेहरु विज्ञान केद्र वरळी मुंबई व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2017-18 मध्ये विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा विविध स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. विज्ञान नाट्यातुन विज्ञान लोकप्रिय व्हावे आणि मंनोरंजनासोबत सामान्य प्रबोधन व्हावे हा हेतु आहे. गटशिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर तालुक्याच्या सायन्स नाट्योत्सव स्पर्धा येथील श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्यात. तालुक्यातील मुख्याध्यापक गोपाल पवार,अंबालाल पाटील,सावित्री वळवी,विजय पाटील,रविंद्र वाघ,पी. एन. गावीत,धर्मेद्र वाघ,दिनेश बिरारीस,अमीरा वळवी,दासु गावीत,एम जे सुर्यवंशी, राजेंद्र चव्हाण,डी के बोरसे,दक्षा कदम,चंद्रकांत गावीतआदि उपस्थित होते.

विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित
यावेळी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिलिंद वाघ अध्यक्षस्थानी होते तर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव सुनिल भामरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले, यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी आर.बी.चौरे, प्राचार्य अनिल पाटील ,उपमुख्याध्यापक विनोद पाटील , उपप्राचार्य एस आर पहुरकर, पर्यवेक्षक प्रविण पाटील, बी आर पाटील ,कमल कोकणी तसेच तालुक्यातील विविध शाळाचे मुख्याध्यापक आदि उपस्थित होते.यावेळी मिलिंद वाघ,सुनिल भामरे,अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .

द्वितीयस्थानी चिंचपाडा विद्यालय
यात प्रथम क्रमांक श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाने पटकवला. या नाट्यासाठी शिक्षिका शोभा गिरासे, अर्चना बिरारी यांचे मार्गदर्शन लाभले तर द्वितीय क्रमांक वनवासी विद्यालय चिंचपाडा ,तर तृतीय क्रमांक – वनिता विद्यालय नवापूर यांनी मिळविला. परिक्षक म्हणुन मेघा पाटील, बी. बी. कापडणे, एस .व्ही. पाटील यांनी काम पाहीले. सुत्रसंचालन अर्चना बिरारी यांनी केल. प्रास्ताविक ऩिलकंठ बागुल तर आभार विकास पाटील यांनी मानले.

सुप्त गुणांना वाव देण्याची संधी
उद्घाटनपर मनोगतात सुनील भामरे यांनी विद्यार्थी यांनी आपल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याची संधी असून अश स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवून सायन्स प्रति रूचि दाखविन्याचे आवाहन केले. नाट्योत्सवात तालुक्यातील शाळांनी उत्फुर्तपणे सहभाग घेतला स्पर्धेत तालुक्यातील इयत्ता सहावी ते दहावीचा विद्यार्थानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विज्ञान नाट्याचा एका चमुत जास्तीत जास्त आठ विद्यार्थी सहभागी झाले होते.