शिंदखेडा । विद्यार्थ्यामधील संशोधकवृत्ती विज्ञान प्रर्दशनातून जोपासली जाते व तेथूनच संशोधनाला चालना मिळते. विज्ञान प्रर्दशनात बाल वैज्ञानिकांनी तयार केलेली उपकरणे ही जरी छोटी असली त्यांचे संशोधनाच्या दृष्टीने मुल्य अधिक असल्याचे प्रतिपादन शिक्षण व आरोग्य सभापती नुतन पाटील यांनी केले. शिंदखेडा तालूका विज्ञान प्रर्दशनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश पाटील होते. पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून विज्ञान प्रर्दशनाचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षण विभाग, तालूका मुख्याध्यापक संघ, तालुका विज्ञान व गणित मंडळ आणि साई चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नरडाणा येथील हिमेश इंग्लिंश मेडीयम स्कूल मध्ये 39 वे तालूका स्तरीय विज्ञान प्रर्दशनाचे 22 व 23डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. 23 डिसेंबर रोजी समारोप होणार आहे.
प्रत्येक क्षेत्रात विज्ञान
पंचायत समिती सदस्य संजिवनी सिसोदे यांनी सांगितले की, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञान आहे.विज्ञान प्रर्दशनातून बाल वैज्ञानिकांच्या शोधक वृत्तीला प्रोत्साहन मिळते. शिक्षक चूकला तर भावी पिढी भरकते व राजकारणी चुकले तर मतदार संघातील मतदार भवितव्य टांगणीला लागते. त्यामुळे बालवैज्ञानिकां प्रमाणेच शिक्षक व राजकारण्यांना जागरूक राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.याप्रसंगी प. स. सदस्य मनोहर देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्ष दिनेश पाटील यांनी बालवैज्ञानिकांनी तयार केलेल्या उपकरणांचे संहग्रालय व्हावे असे आवाहन त्यांनी केले. आभारगटशिक्षणाधिकारी मनिष पवार यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
शिक्षण सभापती नुतन पाटील, जि.प.सदस्य कामराज निकम, शिक्षणाधिकारी प्रविण आहिरे, प.स.सदस्य संजिवनी सिसोदे, मनोहर देवरे, सतिश पाटील, नरेंद्र गिरासे, सत्यजित सिसोदे, शरद पाटील, प्रसन्न सिसोदे, नाना सोनवणे, गटशिक्षणाधिकारी मनिष पवार, एम. एस. सोनवणे, आर. व्हि. पाटील, एस. बी. सुर्यवंशी, किशोर पाटील, पी. के. पारधी, एस. एस. सिरसाठ, एफ. के. गायकवाड, मुख्याध्यापिका सौ. ज्योती पाटील, आदि उपस्थित होते.
163 उपकरणांचा सहभाग
तालूका विज्ञान प्रर्दशनात 163 उपकरण ठेवण्यात आली आहेत.यांत पहिली ते पाचवी या गटात 26, सहावी ते आठवी यां गटात 50, नववी ते बारावी या गटात सर्वाधिक 61, लोकसंख्या शिक्षण प्राथमिक गटात 5, माध्यमिक गटात 6, व्यवसाय मार्गदर्शन 5, प्रयोग शाळा सहाय्यक गट एक, शैक्षणिक साहित्य प्राथमिक 6, माध्यमिक गटात चार उपकरणांचा समावेश आहे.
दरववर्षी होणार्या विज्ञान प्रर्दशनामुळे आम्हा विद्यार्थ्याना विवीध विषय संशोधनाचे माहित होतात.संशोधनाचे क्षेत्रात देखील करीयरच्या अनेक संधी आहेत.उपकरण तयार करण्यासाठी विचाराला चालना मिळते, या निमित्ताने विज्ञानाची अधिकची चार पुस्तके वाचली जातात. यामुळे बौध्दिक पातळी वाढण्यास मदत होते.
– ऋषीकेश तमखाने
(एमएचएसएस क.महाविद्यालय शिंदखेडा)
अतिशय दुर्गम भागात कोणत्याही सोई फारश्या नाही.दुर्गम भागातील समस्या व त्यावरील उपाय मांडण्याची संधी विज्ञान प्रर्दशनाच्या माध्यमातून आम्हा विद्यार्थ्याना मिळते.
– सुनिल भिल
(जि.प.शाळा, वारगांव, ता.शिरपूर)