विज्ञान प्रदर्शन संपन्न

0

चिंबळी : चिंबळीफाटा (ता. खेड) येथिल शांताई मेमोरियल स्कुलचे नुकतेच विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले असल्याचे मुख्याध्यापिका स्वाती जैद यांनी सागिंतले.

जैद पाटील एज्युकेशन सोसायटी अतंर्गत शांताई मेमोरियमच्या वतीने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात विध्यार्थानी विविध प्रकारचे प्रकल्प सादर केले. यामध्ये प्रदुषण मुक्त,सौर उर्जा,व शारीरिक रचना असे पंचवीस ते तीस विषयावर प्रकल्प आयोजित केले. याप्रसंगी शांताई मेमोरियल स्कुलचे संस्थापक अध्यक्ष अनुराग जैद व जैद पाटील एज्युकेशन संस्थेच्या वतीने या सर्व विध्यार्थाचे व मार्गदर्शन करणारे वर्ग शिक्षक विध्या पाडेकर जागृती खंडागळे,श्रुतिका महाजन, प्रिया निकम यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापिका स्वाती जैद यांनी केले व आभार उपमुख्याध्यापिका नितू तोमर यांनी मानले.