विज्ञान प्रसारासाठी उमविला सहकार्याचे आश्‍वासन

0

जळगाव। भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान प्रसार शाखेचे मुख्य आणि वौज्ञानिक डॉ.टी.व्ही.व्यंकटेश्वरन यांनी सोमवार 5 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला भेट दिली. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांची भेट घेवून विज्ञान प्रसाराच्या अनुषंगाने भविष्यात घेण्यात येणाज्या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली. डॉ.व्यंकटेश्वरन यांनी विज्ञान प्रसारासाठी विद्यापीठाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

’इंडिया सायन्स वायर’ हा नवीन उपक्रम या विभागाकडून सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांसंबंधी कार्यक्रम उमवित राबविले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठात विज्ञान शाखेच्या पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या संशोधन वृध्दी उन्हाळी कार्यशाळेस भेट देवून डॉ.व्यंकटेश्वरन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विज्ञान प्रसार विभागाच्या वतीने ’लेड बेस बॅटरी’ तसेच वैज्ञानिक खेळणी देण्यात आली आहे. या भेटी प्रसंगी डॉ.एस.टी.बेंद्रे उपस्थित होेते.