विज चोरी प्रकरणी नऊ जणांवर दंडात्मक करावाई

0

जळगाव । तालुक्यातील आसोदा गावात विद्यूत महामंडळाच्या कनिष्ठ अभियंत्यासह पथकाने विज चोरणार्‍या नऊ जणांवर कारवाई करत जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लघुदाब वाहिनीवर काळ्या रंगाच्या सर्व्हिस वायरच्या सहाय्याने आकडा टाकून त्याद्वारे घरात अनधिकृतपणे विद्यूत प्रवाह जाडून विजेचा वापर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यात दोन पंच यांच्यासाक्षिने विज चोरणार्‍यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

अशी केली कारवाई
आसोदा कक्षातील कनिष्ठ अभियंता हर्षा सोनवणे यांच्यासह महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने 30 एप्रिल 2018 रोजी आसोदा गावातील पाटील वाडा, बाहेरपुरा, कोल्हेवाडा, गुरूकुल नगर या परीसरात मोठ्या प्रमाणावर आकोडा टाकून विजचोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मधुकर दिगंबर भोळे रा. कोल्हे वाडा आसोदा ता.जळगाव, (432 युनिट) एकुण 3520 रूपयाचा दंड, भरत लक्ष्मण कोल्हे रा. कोल्हे वाडा आसोदा (432 युनिट) एकुण 3520 रूपयाचा दंड, सुरेश दगडू पाटील रा.पाटील वाडा, असोदा (432 युनिट) एकुण 3520 रूपयाचा दंड, अशोक भास्कर पाटील रा. पाटील वाडा (950 युनिट) एकुण 7740 रूपयांचा दंड, कमलाबाई रविंद्र पाटील रा.पाटील वाडा असोदा (432 युनिट) एकुण 3520 रूपयाचा दंड, अरूण पुंडलिक भोळे रा. पाटील वाडा आसोदा (432 युनिट) एकुण किंमत 3520 रूपयांचा दंड, विराबाई शशिकांत सपकाळे रा.पाटील वाडा आसोदा (432 युनिट) एकुण 3520 रूपयांचा दंड, संजू उत्तम पवार रा.बाहेपूरा आसोदा (432 युनिट) एकुण 3520 रूपयांचा दंड, नालूबाई चिंदू कोळी रा. गुरूकुल नगर आसोदा (432 युनिट) एकुण 3520 रूपयांचा दंड असे एकुण नऊ जणांवर विज चोरी केली आहे. आसोदा विभागातील कनिष्ठ अभियंता हर्षा श्रीराम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून वरील 9 जणांवर जिल्हा पेठ पोलीसात भारतीय विद्यूत अधिनियम 2003च्या कलम 135 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.