भुसावळ । सुरक्षा, सुरक्षितता आणि पर्यावरण संगोपन या त्रिसूत्रीसोबत कार्य करुनच आपल्याला कंपनीचा विकास साधायचा आहे. स्पर्धेच्या युगात कमीतकमी खर्चात, काटकसर करुन वीज निर्मिती करावयाची आहे. आपला वीज दर कमीत कमी कसा करता येईल यासाठी आपण सर्वांनी सोबत नियोजन करावयाचे असल्याचे विचार मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांनी यावेळी मांडले.
बावस्कर यांनी स्विकारला पदभार
दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात मुख्य अभियंता म्हणून राजेंद्र बावस्कर यांनी पदभार स्वीकारला. 24 मार्च रोजी मुख्य अभियंता अभय हरणे यांची मुख्यालयातील कोळसा विभागात बदली झाली होती, तेव्हापासून उपमुख्य अभियंता माधव कोठुळे यांच्याकडे मुख्य अभियंता या पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला होता. आता पारस येथे कार्यरत असलेले मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांची बदली भुसावळ येथे झाली असून प्रभारी मुख्य अभियंता माधव कोठुळे यांच्याकडून त्यांनी मंगळवार 20 रोजी पदभार स्वीकारला.
500 मेगावॉटच्या सभागृहात सकाळी 10 वाजता पार पडलेल्या स्वागत समारंभात प्रभारी मुख्य अभियंता माधव कोठुळे यांनी राजेंद्र बावस्कर यांचे केंद्राच्यावतीने स्वागत केले. त्यानंतर उपमुख्य अभियंता नितीन गगे आणि सर्व अधिक्षक अभियंता आणि विभाग प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी स्वागताचा स्विकारकरीता उपस्थित अधिकार्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व विभागांचा कामाचा आढावा घेतला. दुपारच्या सत्रात 3.30 वा. 210 मेगावॉटच्या सभागृहात उप मुख्य अभियंता एल.बी. चौधरी यांनी मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर यांचे स्वागत केले. ओळख परिचयानंतर बावस्कर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यापूर्वी 2015 मध्ये मुख्य अभियंता पदी तर त्यापूर्वी कार्यकारी अभियंता म्हणून या केंद्रात सेवा बजावलेली असल्यामुळे आणि मुळचे भुसावळचे असल्यामुळे एक ओढ, एक आपलेपणा या केंद्राच्या बाबतीत जाणवतो अशी भावना राजेंद्र बावस्कर यांनी व्यक्त केली.