चाळीसगाव। गुरुवारी 25 रोजी वातावरणातील तापमानाची तिव्रता प्रचंड होती. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता. दरम्यान चाळीसगाव तालुक्यात गुरुवारी अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
त्यात चिंचगव्हाण येथील शब्बीरखाँ सांडेखाँ पठाण वय 50 यांच्या अंगावर विज पडून त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी 4-30 ते 5 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. रात्री उशिरा पर्यंत मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.