बामखेडा (प्रतिनिधी ) शहादा तालुक्यातील दोदंवाडा शेत शिवारात वीज पडून एकाचा मृत्यू तर दुसरा जखमी झाल्याची घटना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर असे की शहादा तालुक्यातील फेस येथील रहिवासी अर्जुन सोमजी पाटील यांचे दोदंवाडे शिवारात असलेले शेत सायसिंग तडवी वय 25 हा नफ्याने करीत होता.तो कुटुंबासह शेतात झोपडीत राहत होता. आज दिनांक १८ रोजी ४ वाजेच्या सुमारास वीज व वाऱ्यासह दमदार पावसाने सुरुवात झाली होती. सायसिंग तेजका तडवी व पत्नी ईमा सायसिंग व सासू रतनी गोमता पाडवी व शेतमजूर ईश्वर नथ्थू चौधरी राहणार फेस हे शेतात असलेल्या झोपडीत थांबलेले होते. तेवढ्यात मोठ्या आवाजाने विजेचा आवाज झाला त्यात वीज पडल्याने सायसिंग तेजका तडवी वय 25 राहनार वरखेडा ता.धडगाव याचा मृत्यू झाला. तर शेतमजूर ईश्वर नथू चौधरी राहणार फेस हा जखमी झाला. जखमीला नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पत्नी ईमा सायसिंग व सासू रतनी गोमता पाडवी हे काही काळ बेशुद्ध होते. ते शुद्धीवर आल्यावर त्यांनी आजू बाजूला राहणारे आपले नातेवाईक यांना फोन करून बोलवले. पाऊस पडल्यामुळे घटनास्थळी जाण्यात अडथळा येत असल्याने नातेवाईकांनी लाकडी दांडीला झोळी बांधून रस्त्यावर आणले . तेथे मंडळ अधिकारी विजय सावळे, तलाठी महेश ठाकरे, निलेश मोरे, यांनी पंचनामा केला. तसेच सारंखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक , भगवान कोळी, यांनी ही पंचनामा करून मृत्यू पडलेल्या सायसिंग तडवी याला शवविच्छेदन करण्यासाठी सारंगखेडा रुग्णालयात पाठवले. आदिवासी कुटुंबीयांना शासकीय मदत मिळावी.हीचअपेक्षा पंच क्रोशितील नागरिक करीत आहे.
Next Post