विज बिलाची 2 कोटी 80 लाखांची वसुली

0

भुसावळ । मार्च महिना सुरु असल्याने विज वितरण कंपनीकडून बीव बिलाची थकबाकी वसुलीवर जोर दिला जात असून आतापर्यंत वीज कंपनीकडून 550 जणांचे वीज कनेक्शन कापले असून थकीत 4 कोटी 80 लाख रुपयांंपैकी जवळपास निम्मे थकबाकी वसुल करण्यात आली असून काही शासकीय कार्यालयांसह अनेक ग्राहकांकडे लाखो रुपयांची बाकी थकीत असल्याची माहिती वीज वितरणच्या सूत्रांनी दिली.

4 कोटी 80 लाखांची थकबाकी
शहरात थकीत 4 कोटी 80 लाखांपैकी जवळपास 2 कोटी 80 लाखांची वसुली करण्यात आली आहे. थकबाकीदारांमध्ये सर्व समान्या ग्राहकांसह शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. यात तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या 1लाख 50 हजार रुपयांची थकबाकीचा भरणा नुकताच करण्यात आला आहे. यासह शहर पोलिस ठाणे व बाजारपेठ पोलिस ठाण्याची जवळपास 3 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी आहे. ही रक्कम भण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शहरातील थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिलाच्या थकीत रक्कम जमा केली जात नसल्याने आतापर्यंत 550 ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. यात 6 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून थकीत असलेल्या ग्राहकांची वीज जोडणी कायम स्वरुपी कट करुन मीटर जमा करण्यात आले आहे. तर 2-3 महिन्यांपासून बील थकीत असणार्‍यांची विज जोडणी पोलवरुन कट करण्यात आली आहे.

वीज कंपनीकडून थकीत वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली आहे. यातून मोठ्या प्रमाणात वसुली सुरु आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी आपली थकीत रक्कमेचा भरणा करुन वीज पुरठा खंडित करण्याची करवाई टाळवी ही मोहिम पुढेही अशीच सुरु राहील. ग्राहकांनी वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे.
-व्ही.डी.नवघरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता,वीज वितरण कंपनी, भुसावळ