जळगाव । पाणी पुरवठा योजनेला महावितरण विजपुरवठा करीत असते. ग्रामपंचायतीमार्फत या विजबीलाची देयके अदा करण्यात येते. कधीकधी आर्थिक अडचणी अभावी विजबील थकविली जातात. संबंधीत योजना बंद करण्याची वेळ येते. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचयतींकडे वर्षानुवर्षे पाणी पुरवठा योजनेची बीले थकीत पडल्याने योजना बंद पडण्याची नामुष्की अनेकदा ओढविली आहे. यावर पर्याय म्हणून आणि थकीत विजबीलाच्या समस्येवर कायमचे मात करण्यासाठी माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने मुक्ताईनगर, रावेर, बोदवड तालुक्यातील सर्व सामूहिक पाणीपुरवठा योजनांवर सौरपंप बसवण्यात येणार आहे. सौरपंप बसविण्याची मंजुरी उर्जामंत्र्यांनी दिली आहे. मंगळवारी 1 रोजी आमदार एकनाथराव खडसे यांनी यासंदर्भात उर्जामंत्र्यांची त्यांच्या दालनात भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबतच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, झेडपी सदस्य जयपाल बोदडे उपस्थित हेते.
पाणी पुरवठा थकीत रक्कम
सामुदायकि पाणी पुरवठा योजनेचे मुक्ताईनगर तालुक्याकडे 11 कोटी 49 लाख, भुसावळ 9 कोटी 96 लाख, चाळीसगाव 5 कोटी 69 लाख, धरणगाव 50 कोटी 35 लाख, जळगाव शहर 8 कोटी 19 लाख, पाचोरा 15 कोटी 58 लाख, सावदा 35 कोटी 26 लाख रुपये थकीत आहे. जिल्ह्याभरात ही थकीत रक्कम 136 कोटी 55 लाख इतकी आहे. या थकीत रकमेच्या वसूलीसाठी प्रसंगी महावितरण विभागाला विज पुरवठा खंडीत करावी लागते त्यामुळे योजना सुरळीत चालु राहत नाही.
पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती
जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 513 ग्रामपंचायतीतील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचा विजपुरवठा थकीत असल्याने खंडीत करण्यात आले आहे. त्यामुळे भरपावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वाढत्या थकबाकीमुळे महावितरणकडून विजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्यात आली आहे. किमान चालू तीन महिन्यांचे विजबीले तरी भरा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
घरगुती वापरातील थकीत
भुसावळ 6 कोटी 26 लाख, चाळीसगाव 5 कोटी 34 लाख, धरणगाव 6 कोटी 75 लाख, जळगाव शहर 36 कोटी 30 लाख, मुक्ताईनगर 1 कोटी 92 लाख, पाचोरा 6 कोटी 3 लाख, सावदा 2 कोटीचे विजबील थकीत आहे.
वाणिज्य वापरातील थकीत
भुसावळ 2 कोटी 14 लाख, चाळीसगाव 95 लाख, धरणगाव 1 कोटी 62 लाख, 5 कोटी 62 लाख, जळगाव शहर 5 कोटी 92 लाख, मुक्ताईनगर 27 लाख, पाचोरा 93 लाख, सावदा 64 लाख रुपये थकीत आहे.
औद्योगिक वापरातील थकीत
भुसावळ 40 लाख, चाळीसगाव 20 लाख, धरणगाव 63 लाख, जळगाव शहर 4 कोटी 45 लाख, मुक्ताईनगर 13 लाख, पाचोरा 46 लाख, सावदा 15 लाख रुपये थकीत आहे.
पथदिवे वापरातील थकीत
भुसावळ 15 कोटी 10 लाख, चाळीसगाव 7 कोटी 91 लाख, धरणगाव 19 कोटी 42 लाख, जळगाव शहर 10 कोटी 2 लाख, मुक्ताईनगर 10 कोटी 7 लाख, पाचोरा 12 कोटी 44 लाख, सावदा 48 कोटी 97 लाख रुपये थकीत आहे.
कृषी वापरातील थकीत
भुसावळ 177 कोटी 36 लाख, चाळीसगाव 121 कोटी 94 लाख, धरणगाव 504 कोटी, जळगाव शहर 94 कोटी, मुक्ताईनगर 149 कोटी 94 लाख, पाचोरा 272 कोटी 85 लाख, सावदा 220 कोटी 34 लाख रुपये थकीत आहे.
2 सप्टेंबरला भुमिपुजन
मुक्ताईनगर मतदार संघातील गावांसह सावदा नगरपालिका व 81 गावांची सामुहीक पाणी पुरवठा योजनेचा यामध्ये समावेश आहे. या सौर पथदर्शी प्रकल्पाचा 2 सप्टेंबर रोजी शुभारंभ होणार आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की येथील 132 केव्ही ए सबस्टेशनच्या भुमिपुजनाचा देखील कार्यक्रम होईल. सावदा विभागासाठी शंभर केव्ही ट्रान्सफार्मर इंफ्रा 2 योजनेअंतर्गत बाकी असलेल्या शेतीपंपाचाही जोडणी करण्यात येणार आहे असे आवाहन उर्जामंत्रींनी दिले आहे.