विज वितरणाचा भोंगळ कारभार

0

भडगाव । भडगाव शहरात वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे विज पुर्णपणे बंद झाली असून तीन दिवस उलटूनही अद्यापर्यंत वीज वितरण विभागाने आजूनही या कडे लक्ष दिलेले नाही, याकारणामुळे शहरातील हजारो नागरीक, महिला, अबाल वृद्ध व लहान मुले यांचे मोठ्या प्रमाणावर उन्हामुळे हाल होत आहे. वीज वितरणाच्या या भोंगळ कारभारामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत असून येथील उपअभियंता आर.बी.शुक्ला यांना निलंबित करण्याची मागणी परीसरातील नागरीकांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर नागरीकांच्या या आहेत मागण्या
भडगाव शहरातील अनेक वीज तारा जीर्ण झालेले असतांना सदर वीज पुरवठा खंडीत असतांना दुरूस्तीचे कामे पावसाळ्यापुर्वी युद्धपातळीवर करणे आवश्यक असतांना ती पुर्वव्रत झाली नाही. मंगळवार 30 मे 2017 रोजी बाळद रोड भागातील पोल आणी तारा तुटल्यामुळे वीज यंत्रणा खंडीत झाली त्यावेळी वीज वितरण सुरू असतांना अनेक नागरीकांचा बळी जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. या सर्व प्रकारामुळे विज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे भडगांव शहरातील नागरीकांना प्रचंड त्रास होऊन त्यांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे भडगांव शहरातील नागरीकांचा सयमांचा अंत झाला असुन कायदा आणी सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे विज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे जिवीत हानी झाल्यास तसेच कायदा व सुव्वस्था निर्माण झाल्यास संबधीत विज वितरण कंपनीचे सर्व अधिकारी जबाबदार असतील.