विटनेर येथे शेतीचे अवजारे चोरीस

0

जळगाव । तालुक्यातील विटनेर शेती शिवारातून मध्यरात्री चोरट्यांनी शेती साहित्य लांबवून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेबाबात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील विटनेर शेती शिवारात शांताराम हरी गावंडे यांचे शेत आहे. त्यांनी शेती पिकांवर फवारणी करण्यासाठी फवारणी यंत्र, बियाणे खरेदी केली होती. सर्व सामान शेतातच ठेवलेले असतांना मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने 1 हजार 500 रुपये किमंतीचा फवारणी पंप, 500 रुपयाची प्लॉस्टीक पिशवी, 1 हजार रुपयांचे तणनाशक, 200 रुपयांचा युरीया असा 3 हजार 200 रुपयांचे शेतीसाठी लागणारे साहित्या अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी शेतकरी शांताराम गांवडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.