विटवा गावातील प्रौढाचा संशयास्पद मृत्यू

रावेर : रावेर तालुक्यातील विटवाव गावातील 45 वर्षीय व्यक्तीचा शेत-शिवारात संशयास्पद मृत्यू झाला असून या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भादू रमेश मनुरे (45, विटवा, ता.रावेर) असे मयताचे नाव आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर कळणार स्पष्ट कारण
रावेर तालुक्यातील विटवा शेत-शिवारात भादू रमेश मनुरे (45) या व्यक्तीचा मृतदेह गुरूवार, 10 मार्च रोजी आढळला. मनुरे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही तर याबाबत अनेक तर्क-वितर्कदेखील आहेत. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात दोन मुले आहेत. रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.