विटवा येथील 23 वर्षीय युवकाची आत्महत्या

रावेर : रावेर तालुक्यातील विटवा येथील एका 23 वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. रावेर ग्रामीण रुग्णालयातुन मिळालेली माहिती अशी की, विटवा येथील आकाश वानखेडे (23) या तरुणाने घरात कोणीही नसताना साडीच्या सहायाने आत्महत्या केली. सोमवार, 6 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.