विटवेच्या सरपंचपदी भास्कर चौधरी

0

रावेर तालुक्यात जात प्रमाणपत्राअभावी 22 जागा राहिल्या रीक्त

रावेर– विटवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भास्कर चौधरी विजयी झाले. बुधवारी सकाळी 10.30 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणीसाठी पाच कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. सरपंच पदाकरीता तिरंगी लढतीत एक हजार 709 मतदारांनी हक्क बजावला. भास्कर विश्वनाथ चौधरी यांना (709) मते मिळवून विजयी झाले तर उदय पाटील (645) व दत्तात्रय महाजन (346) मते मिळवून पराभूत झाले. अन्य विजयी सदस्यांमध्ये गणेश मनुरे (193), लक्ष्मी वानखेडे (199), रुपाली कोळी (303)चेतन पाटील (370), दीपाली चौधरी (435), नम्रता चौधरी (398), दीपक मनुरे (306), सुरेश कोळी (267), सकूबाई भिल्ल (256) यांचा समावेश आहे.

उदळीसह विवर्‍यात पोटनिवडणूक
विवरे खुर्द येथे एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुमन बोरनारे (283) मते मिळून विजयी झाल्या. त्यांनी छाया गाढे (184) यांचा पराभव केला. उदळी बु..॥ येथे एका जागे साठी झालेल्या पोटनिवडणुकीत विद्यादेवी बार्‍हे (219) मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी मंदाबाई सोनवणे (116) यांचा पराभव केला. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीच्या जातप्रमाणपत्राअभावी 22 अनुसूचित प्रवर्गाच्या जागा रीक्त आहेत.