विटव्याच्या युवकाची तापी पात्रात आत्महत्या

0

रावेर- तालुक्यातील विटवा येथील 28 वर्षीय युवकाने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी 10 ते 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. उद्योग प्रकाश धनगर (28) असे मृत युवकाचे नाव आहे. निंभोरासीम येथील तापी नदीच्या पुलावरून या तरुणाने दुचाकी लावत उडी लावत तापी पात्रात उडी घेतली. घटनेची माहिती निंभोरा पोलिसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी तत्काळ हवालदार मेहमूद शहा यांना घटनास्थळी रवाना केले. हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने तापी नदीला पूर आल्याने नदीला पूर आला असून तरुणाचा शोध लागू शकला नाही. पोलिसांनी याबाबत तापी काठाच्या गावांना तरुण आढळल्यास त्याबाबत माहिती कळवण्याचे सूचित केले आहे. मयत उद्योग धनगर याच्या पश्‍चात पत्नी, मुलगा असा परीवार आहे.