विटाई गावात निवडणूकीच्या वादातून हाणामारी

0

शिंदखेडा । ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून शिंदखेडा तालुक्यातील विटाई गावात दोन गटात तुफान धुमश्‍चक्री उडाली. काल सकाळी उसळलेल्या दंगलीत चौदा जण जखमी झाले असून पोलिसांनी 63 दंगलखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

नंदु पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बापू शिरसाठ, सचिन शिरसाठ, शालीग्राम शिरसाठसह 24 जणांनी लाठ्याकाठ्यांनी नंदू पाटील आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला चढविला त्यात नंदू पाटील, अनिल पवार, नरेंद्र पवार, कौतीक पवार, चिंतामण पवार, छायाबाई पवार हे जखमी झाले. संध्याकाळी 6 वा. नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय विनोद पाटील करीत आहेत.

किराणा दुकानाची मोडतोड
संदीप बापू पाटील (वय 35) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विटाई गावातील गाव दरवाजाजवळ निवडणुकीच्या वादातून शरद आसाराम पवार, नंदू पवार, प्रभाकर पवारसह 39 हल्लेखोरांनी लाठ्याकाठ्या, विटांनी संदीप पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला चढविला. त्यात संदीप पाटील, बापू पाटील, सुनिल पाटील, सचिन पाटील, योगेश पाटील, उज्वलाबाई पाटील, संगीताबाई पाटील, रावसाहेब पाटील हे जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी किराणा दुकानाची मोडतोड केली आहे.