विठूरायाच्या चरणी भक्तांची गर्दी

0

पंढरपूर : सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही शनिवारपासून मोठी गर्दी होत आहे. शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळच्या सलग सुट्ट्या मिळाल्यामुळे रविवारीही विठ्ठल मंदिर भाविकांनी फुलले होते. दर्शनासाठी विठूरायाचरणी भाविकांची दिवसभर मोठी रांग लागली होती. पंढरपूरला यात्रेचे स्वरूप आल्याचे दिसत आहे.

यात ऑनलाईन दर्शनामुळे इतर भाविकांना वेळ लागत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. राज्यभरातील पर्यटकांची अलोट गर्दी झाल्याने मंदिर व्यवस्थापनाने जादा सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. मावळत्या वर्षाला विठूरायाच्या साक्षीने निरोप देण्यासाठी ही गर्दी वाढत चालली असून आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात मधील पर्यटकांची वाढती संख्या पाहता आणखी दोन विठ्ठल मंदिर ओव्हरफ्लो राहण्याची शक्यता आहे.