शिरगाव : जागतिक साक्षरता दिनानिमित्त सोमाटणे येथील जि.प.शाळा विठ्ठलवाडी यांच्यावतीने गावातून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी गावाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘शिकेल तोच टिकेल’ हे पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून मुलांनी माणसाच्या जीवनात शिक्षण किती महत्वाचे आहे, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या पथनाट्यातील सादरीकरणासाठी व उपस्थितांनी टाळ्या वाजवून मुलांचे कौतुक केले. वेगवेगळ्या घोषणा व घोषणा फलक यामुळे परिसरातील वातावरण साक्षरतामय झाले होते. या उपक्रमात सर्व विद्यार्थी उत्फूर्तपणे सहभागी झाले होते. हा उपक्रम शिक्षकांनी मोठ्या आनंदाने साजरा केला.
तर-
हे देखील वाचा
…तर राज्य साक्षर होईलया पथनाट्याला व प्रभातफेरीचे पालक व परिसरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. या उपक्रमाविषयी केंद्रप्रमुख बाळासाहेब गावडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, प्रत्येक शाळेत असे उपक्रम घेवून शिक्षणाविषयी जनजागृती केली पाहिजे तरच घराघरात शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविता येईल. संपूर्ण राज्य साक्षर होण्यासाठी वेळ लागणार नाही. या शाळेतील शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. प्रत्येक उपक्रम हे सर्वजण मिळून मिसळून साजरे करत असतात. त्यामुळे शाळेतील वातावरण नेहमी हलके फुलके आणि आनंददायी राहण्यास मदत होते. यावेळी दारूब्रे केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब गावडे, मुख्याध्यापक देवीप्रसाद तावरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष आशा गायकवाड, शिक्षीका आशा काळोखे, उज्ज्वला रासेराव, शुभदा आतकरी, राजाराम मुर्हे, अशोक भालेकर पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.