पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचा सरकारवर घणाघात
मुंबई : राज्याची धार्मिक राजधानी असलेली पंढरी नगरी सुरक्षित राहिली नाही. राज्यातून आणि परराज्यातून लाखो भाविक ज्या पंढरपूरात दर्शनासाठी येतात ती पंढरी नगरीच सुरक्षित राहिलेली नाही. दिवसाढवळ्या नगरसेवकांचा गोळ्या घालून खून केल्याची घटना घडलेली आहे. धार्मिक स्थळाची ठिकाणीच कायदा व्यवस्थेचा कशी आहे, असे सांगत पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी सरकारवर घणाघात केला.
सर्वसामान्य माणासाकडे असलेले पिस्तूल ठराविक काळासाठी पोलिस जमा करून घेतात. अशाच पद्धतीने जमा करून घेतलेले पिस्तूल पोलिस स्टेशनमधूनच चोरीला गेल्याचा प्रकार पंढरपूरा मतदार संघात उघडकीस आला आहे. पोलिसच जर गून्हे करू लागले तर त्यांना पकडायचे कोणी असा प्रश्न भारत भालके यांनी उपस्थित केला.
पंढरपूर शहरामध्ये मागील काही दिवसात दोन नगरसेवकांसह तीघांचा खून झाले आहेत. बा विठ्ठलाच्या पंढरपूरात दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या भाविकांची सुरक्षा ही कोणत्या पद्धतीची आहे हे पंढरपूरातील घटनावरून लक्षात येत असल्याचेही भालके यांनी सभागृहात सांगितले.