नाट्यगृहाची कलाकारांकडून पाहणी; चेतन तुपे यांनी दिली माहिती
हडपसर : महापालिकेच्या माध्यमातून पुण्याच्या पूर्व भागात साकारले जात असलेल्या नाट्यगृहास पुण्यातील कलाकारांनी भेट देऊन पाहणी केली, विठ्ठल तुपे-पाटील नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पेक्षकांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी दिली.
तत्कालीन नगरसेवक चेतन तुपे यांनी राज्य शासनाची जागा ताब्यात घेऊन 2009मध्ये नाट्यगृहाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते केले, त्यांनतर या नाट्यगृहासाठी पालिकेच्या माध्यमातून सुमारे 24 कोटी रुपयांची तरतूद करून प्रत्यक्षात काम सुरु केले. वेळोवेळी निधीची तरतूद केली, चालू अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 950 आसन क्षमता असलेल्या या नाट्यगृहात कलाकारांसाठी रूम, डायनिंग टेबल, 10 हजार स्क्वेअर फुटाची आर्ट गॅलरी, स्टुडिओ प्रशस्त पार्किंग अशा सुविधा असणार आहे.
तुपे यांनी पालिकेच्या अधिकार्यांसह कलाकारांना नाट्यगृहात साकारणार्या सर्व गोष्टी बारकाईने फिरून दाखविल्या व सविस्तर माहिती दिली. यावेळी कलाकार आरती शिंदे, प्रशांत बोगम, पंचशीला कांबळ, माधवी मोरे, हसीना मंडल, काव्या शिंदे, बाबा पाटील, इकबाल दरबार, माणिक बजाज, अमित कुचेकर, अमित कदम, केदार मोरे, संदीप पळवाले, विकास वाघमारे, दिलीप मोरे, कैलास भोसले, डॉ. शंतनू जगदाळे, हरदीप टाक व भवन कार्यालयतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्याच्या पूर्व भागात साकारले जात असलेले हे भव्य नाट्यगृह म्हणजे ग्रामीण व शहरी भागातील रसिकांना पर्वणी ठरणार आहे.
नाट्यगृह महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, अडीच कोटी रुपये शासनाला देऊन भूखंड ताब्यात घेतला. 35 हजार स्वकेर फूट भाग, कलाकारांसाठी ग्रीन रूम, राहण्याची व्यवस्था, डायनींग हॉल, व्हीआयपी हॉल, 950 आसनक्षमता आहे, पार्किंग तळमजल्यावर प्रशस्त आहे. नियोजनबद्ध नाट्यगृह केले जाणार आहे, कलाकारांना घेऊन पाहणी केली व सूचना घेतल्या आहेत, काम अंतिम टप्प्यात आहे, डिजिटल स्टुडिओ केला जाईल, नवोदित कलाकारांना संधी मिळेल, हडपसरकरांच्या पसंतीस उतरणारे नाट्यगृह आगामी 7 ते 8 महिन्यात लोकार्पण होईल.
चेतन तुपे, विरोधी पक्षनेते