विठ्ठल दरेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने केले सन्मानित

0

मासिकाच्या वर्धापनदिनानिमित्त केले आयोजन

तळेगाव दाभाडेः मावळ तालुका कुंभार समाजाचे सल्लागार विठ्ठल दरेकर यांना कल्याण येथील आपला कुंभार मित्र या मासिकाच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. कल्याण येथील ‘आपला कुंभार मित्र’ या मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त उद्योजक नानजी खिमजी ठक्कर यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष संजय गाते, माजी महापौर मारुती कतवरे, नगरसेवक सुनील अचोलकार आदी उपस्थित होते. जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेले दरेकर हे संत गोराबोकाका सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष, विठ्ठल मंदिर संस्थानाचे पदाधिकारी तसेच अनेक सामाजिक संस्थाचे सल्लागार म्हणून काम करतात. तळेगाव
दाभाडे परिसरातून दरेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.