विठ्ठल नामाच्या गजरात भाविक दंग

0

जळगाव । आषाढी एकादशीला पंढरपुर येथे जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेणे प्रत्येक भाविकांसाठी शक्य होत नाही. आपल्या लाडक्या विठु रायाचा पदस्पर्श व्हावा यासाठी पंढपुरचा अनुभूती घेत विठ्ठल भक्त विठ्ठल नामाचा गजरात दंग झाले होते. मंगळवारी 4 रोजी जिल्ह्याभरात आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पुजा अर्चना केली. आषाढी निमित्त विठ्ठलाच्या मंदीरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती.

संत सखाराम महाराज मंदिर
अमळनेर। येथील प्रसिद्ध असलेले व प्रती पंढरपूर म्हणून महाराष्ट्र नावलौकिक असलेल्या ’संत सखाराम महाराज संस्थान’ विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी तालुक्यातील ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्शनासाठी महिला व पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. घरगुती दैनंदिन वस्तूंची विक्री मंदीराच्या परिसरात करण्यात आली.

भडगावात गरुड रथ मिरवणूक
भडगाव। येथे आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल मंदीरांची सजावट करुन विधीवत पुजापाठ करण्यात आली. तसेच विविध ठिकाणी फराळ वाटप करण्यात आले. संत सेना महाराज मंदीरात सकाळी किर्तनाचा कार्यक्रम होवुन नाभिक समाजाचे अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. सकाळी बसस्थानक परिसरात तसेच पाचोरा रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ पोलीस सोसायटीचे व्हाईस चेअरमन रवी पाटील यांनी, वाहन चालक मालक संघटनाचे योगेश शिंपी, नाना महाजन, शाम शिंपी, संजय महाजन, गोकुळ चौधरी, संजु भोई, निंबा पाटील, शांताराम पाटील आदींनी नागरिकांना फराळ वाटप केले. त्यानंतर लाडकुबाई विद्यालय येथुन गरुड रथाची मिरवणूक काढण्यात आली.

शेंदुर्णीत जलसंपदामंत्र्यांच्या हस्ते महापूजा
शेंदुर्णी। खान्देशाचे आराध्यदैवत प्रतिपंढरपूर शेंदुर्णी येथील भगवान श्री त्रिविक्रम मंदिरात गेल्या 275 वर्षाहूनही अधिक काळापासून दरवर्षी आषाढी, व कार्तिकी एकादशीला लाखो भक्त भगवान श्री त्रिविक्रम रुपात साक्षात पंढरपूरच्या श्री विठ्ठलाचे दर्शनासाठी शेंदुर्णीत दाखल होतात. खान्देशातील प्रतिपंढरपुर म्हणून शेंदुर्णीला ओळखले जाते. राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या मतदार संघात शेंदुर्णी गाव येते. महाजन यांनी सकाळी सपत्नीक महापुजा केली. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी देखील सपत्नीक पुजा केली. 70 ते 80 हजार भाविकांनी दर्शन घेतले. मागील वर्षापेक्षा यावर्षी भाविकांची संख्या अधिक होती. आषाढी एकादशीला पूजेसाठी रात्री 12 वाजे पासून 2 वाजेपर्यंत मूर्ती अभिषेक व पूजा आटोपल्यावर मंदिर भाविक भक्तासाठी खुले केले जाते तेथून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भक्ताची दर्शनासाठी रीघ लागलेली असते रात्री उशिरापर्यंत कीर्तन सोहळा होता. भक्तांना आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सुविधा स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत कडून पुरविण्यात आल्या. जातात तर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मंदिर परिसरातच भक्तांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आली. सामाजिक व धार्मिक मंडळाच्या वतीने दिवसभर येणार्‍या भक्तासाठी फराळाचे व चहाचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी केशवराव पातोंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, हनुमंतराव गायकवाड, उपनिरीक्षक शिवाजी नागवे यांच्यासह जामनेर येथुन अतिरिक्त पोलीस मागविण्यात आले होते.

चोपड्यात दिंडी सोहळा
चोपडा । मंगळवारी 4 रोजी आषाढी एकादशी निमित्त शहरातील अ मु.साळुंखे प्राथमिक, कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली होती या दिंडी सोहळ्याने चोपडा शहर वासीयांचे डोळ्याचे पारणे फिटले यावेळी पांडुरंगाची पालखी ही सजविण्यात आली होती. दिंडी सोहळा विद्यालयापासून छत्रपती शिवाजी चौक, मेन रोड वरून, गोल मंदिर, गांधी चौकातून शहरात काढण्यात आली. मुख्याध्यापक आर.डी.साठे, एल.एच.अहिरे, जी.जे.शिंदे, एन.आर.पाटील, कपिल बाविस्कर, जी.एस.सनेर, दिपक पाटील, आर.पी.शाह, एम.एन.पाटील आदींनी परिश्रम घेतले. तर पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

आषाढी निमित्त वृक्षारोपण
चाळीसगाव। 1 ते 7 जुलै या कालावधी मध्ये ’चला वृक्षलागवड करु या’ या अभियानाअंतर्गत आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर चाळीसगावातील प्रभाग क्रमांक 5 मधील परिसरात नगरसेविका वंदना जगदीश चौधरी यांनी वृक्षारोपण केले. यावेळी कौतिक चौधरी, बाबुलाल अहिरे, बाबुलाल चौधरी, भास्कर चौधऱी, रघुनाथ चौधरी, सुकदेव चौधरी, राजू परदेशी, बापू चौधरी, धनराज नाकवाल, छोटूभाऊ सरोदे, तुलसीदास चौधरी, रामलाल मंगलकर, महादू नकवाल, बापू पाटील, लक्ष्मीकांत चौधरी, अनिल चौधऱी, विजय चौधरी, मच्छिन्द्र कोळी, जयकुमार चौधरी, गोकुळ चौधरी, मधूकर चौधरी, पुंजाबाई चौधरी, लीलाबाई चौधरी, कमलबाई सरोदे, विनोद पाटील, चेतन चौधरी, स्वप्नील चौधरी आदी उपस्थित होते.

चाळीसगावात पालखी सोहळा : चाळीसगाव। 4 रोजी आषाढी एकादशी निमित्त पवारवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी एकाच गर्दी केली होती. आषाढी एकादशी निम्मित महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तीचा दूध दही व पंचामृत ने अभिषेक करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर शहरातील जय माता भजनी मंडळाच्या नगरसेविका विजया पवार, अ‍ॅड.हेमा शर्मा, उषा पाटील, उज्वला सूर्यवंशी, जयश्री निंबाळकर, स्मिता पवार, चंदा अग्रवाल, विमल सूर्यवंशी, संतोष व्यास, विद्या वाणी, राजकुमारी शर्मा, मालती सुर्वे, संगीता पाटील, अनिता पाटील आदी महिलांनी भजन सादर केले. गुरुकुल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली. भिकन पवार, निंबा पाटील, बबन पवार, सुरेश पवार, गणेश पवार, दिगंबर पवार, सुनील पवार, सतीश पवार, अशोक निखिल पवार, डॉ पाटील आदी भाविक सहभागी झाले होते. वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन जय भवानी मित्र मंडळ, विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान पवारवाडी यांच्या वतीने करण्यात आले होते.

वढोद्यात उपजिल्हाधिकारी यांच्याहस्ते पूजा
चोपडा। तालुक्यातील वढोदा येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके व तहसीलदार दीपक गिरासे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली. यावेळी पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, जीवन चौधरी, कृउबा सभापती जगन्नाथ पाटील, घनःश्याम पाटील, गिरिष पाटील, अ‍ॅड.डी.पी.पाटील, गोकुळ पाटील, सदाशिव पाटील, मच्छिंद्र पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. आषाढीनिमित्त वढोदा येथे नजीकच्या शिरपूर व चोपडा तालुक्यातील विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने गावाला यात्रेचे स्वरूप आले होते.

वरखेडीत फराळ वाटप
वरखेडी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्‍वर येथे आषाढी एकादशी निमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येत असते. एकादशीनिमित्त ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या नर्मदाबाई उत्तम भोई व त्यांचे पती उत्तम सुखाराम भोई यांनी भाविकांना फराळाचे वाटप केले. गेल्या दहा वर्षा पासून आषाडी एकादशीच्या दिवसी पिंपळगाव (हरे) ला श्री गुरु गोविंद महाराजंच्या व पांडुरंगच्या दर्शनाला पायी दिंडी व वाहनाने जाणार्‍या भाविकांना फराहाचे वाटप करण्यात येते. फराळ वाटप करतांना उत्तम पाटील, डॉ.धनराज पाटील, नितीन भोई, दिपक सूर्यवंशी, भैय्या महाजन, दिलीप धोबी, शरद कुभांर, रामेश्वर पाटील यांनी मदत केली. श्री भैरवनाथ बाबा संस्था सावखेडा, श्री गुप्तेश्वर महादेव मंदिर भोजे येथील युवक सावखेडा बु येथील ग्रामस्थ यांनी ठीकठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली होती.