विठ्ठल रुखमाईला चंदनऊटी

0

तळेगाव दाभाडे : चैत्रशुद्ध एकादशी निमित्त येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठल व रुक्मिणी यांना चंदनउटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविक मोठ्या संख्येनी दर्शनासाठी उपस्थित होते. पहाटे काकड आरती, भजन, सायंकाळी प्रवचन,कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे व सोनाली भेगडे यांचे हस्ते अभिषेक व महापूजा तसेच चंदनउटी सोहळा पार पडला.यावेळी छबुराव भेगडे, शालिनी भेगडे, शांताबाई तावरे उपस्थित होते. सांयकाळी हभप ज्ञानेश्‍वर महाराज दाभाडे यांचे प्रवचन तर हभप दगडू महाराज परांडे यांचे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मोहन झेंडे,अप्पा शिरुरे,विठ्ठल दरेकर, नामदेव भेगडे, किरण आवारे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.