भुसावळ : हिंदी सेवा मंडळ संचलित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन इंजीनियरिंग विभागाच्या वतीने भारत सरकारच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयाचा विशेष प्रकल्प वित्तीय साक्षरता अभियानाचे 7 व 8 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलेले होते. महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील तरुण व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
चित्रफितीद्वारे मार्गदर्शन
परिसरातील जय गणेश व अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघाच्या जेष्ठ नागरिकांना साध्या व सोप्या भाषेमध्ये मराठी अनुवाद असलेले काही चित्रफित दाखवले. श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन इंजीनियरिंग विभागाच्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरता अभियान राबविले गेले आहे.
10 हजार जनतेपर्यंत साक्षरता करणार
भुसावळ परिसरातील कमीत कमी 10 हजार जनतेपर्यंत आर्थिक साक्षरता आणि वित्तीय सर्वंकषता नेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन इंजीनियरिंग विभागाच्या वतीने हा राष्ट्रीय हिताचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह यांनी याप्रसंगी सांगितले.पंचवार्षिक योजनेत बँकिंग, सिक्युरिटी मार्केट, विमा आणि निवृत्तीचे नियोजन या चार बाबींवर जास्त लक्ष केंद्रीत करण्यात आले असे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन इंजीनियरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.
आर्थिक साक्षरतेमुळे समाजाचे लुटारू योजनांपासून बचाव होणार
पुढील आठवड्यात मसुद्यानुसार, आपल्या पैशाचे व्यवस्थापन कसे करावे याचे शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी वित्तीय उत्पादन व सेवांचा वापर कसा करावा याचे शिक्षण दिले जाईल. आर्थिक साक्षरतेमुळे व्यक्ती आणि समाजाचे लुटारू योजनांपासून बचाव होणार आहे असे या अभियानाचे प्रमुख प्रा. अनंत भिडे यांनी कळवले आहे.प्रा. दिपक साकळे, प्रा. धिरज पाटील, प्रा. गजानन पाटील, विजय विसपुते यांनी डिजिटल साक्षरता मसुद्याचा सखोल अभ्यास सुरु केलेला असून नागरिकांपर्यंत हा मसुदा पोहचवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प सुरु करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.