जळगाव। पुणगांव येथून घरी आमोदा खुर्द येथे जात असलेल्या प्रौढाचा रस्त्यातच दुचाकीचा अपघात होवून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना दुपारी 3 वाजेच्या सुमारास विदगाव पुलाजवळ घडली. गोकुळ त्र्यंबक सपकाळे वय-45 असे मयत प्रौढाचे नाव आहे.
आमोदा खुर्द येथील रहिवासी गोकुळ त्र्यंबक सपकाळे हे दुचाकी (क्रं.एमएच.19.एबी.5319) ने सकाळी पुणगांव येथे त्यांच्या सासर्यांकडे दशक्रिया विधीसाठी गेले होते. दशक्रिया विधी आटोपून सपकाळे हे घरी जाण्यासाठी पुणगांव येथून निघाले. दुपारी 3 वाजेच्या सुमारास विदगाव पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मारला बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर परिसरातील नागरिकांनी गोकुळ सपकाळे यांना रूग्णावाहिकेतून लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यानंतर नातेवाईकांनाही अपघाताची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा रूग्णालयात गाठत एकच गर्दी केली होती.