23 ते 26 एप्रिल दरम्यान तीव्रता वाढणार
नागपूर : राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरसरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने इशारा दिला आहे. 23 ते 26 एप्रिल या काळात तापमान वाढण्याची शक्यता आहे.
प्रमुख शहरांतील कमाल तापमान
मुंबई (कुलाबा) 33.0, अलिबाग 32.2, रत्नागिरी 34.7, पणजी (गोवा) 35.4, डहाणू 33.3, पुणे 38.5, अहमदनगर 41.1, जळगाव 41.0, कोल्हापूर 38.9, महाबळेश्वर 33.6, मालेगाव 40.8, नालिक 37.3, सांगली 40.8, सातारा 39.6, सोलापूर 42.1, औरंगाबाद 39.1, परभणी 42.9, अकोला 42.6, अमरावती 41.4, बुलढाणा 39.6, ब्रह्मपुरी 44.8, चंद्रपूर 44.2, गोंदिया 41.0, नागपूर 42.9, वर्धा 42.9, यवतमाळ 42.0.