तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ
जळगावमध्ये सर्वाधिक 41.8 तापमान
पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. राज्यात सोमवारी सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे 41.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मागील चोवीस तासात राज्यातील काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली असून, उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते. दरम्यान, 5, 6, 7 एप्रिलरोजी विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
वादळीवार्यासह पाऊस
विदर्भात 5 एप्रिलरोजी तसेच 6 एप्रिलला विदर्भ व मराठवाड्यात वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे़ या काळात राज्यात इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. तसेच 7 एप्रिलरोजीसुद्धा मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे 38.6, अहमदनगर 40.5, जळगाव 41.8, कोल्हापूर 37, महाबळेश्वर 32.6, मालेगाव 41.2, नाशिक 39.2, सांगली 38.2, सातारा 37.7, सोलापूर 40.6, मुंबई 31.8, सातांक्रुझ 33.4, अलिबाग 30.5, रत्नागिरी 32.5, पणजी 32.6, डहाणू 31.6, औरंगाबाद 39.4, परभणी 41.4, नांदेड 40.5, अकोला 41.6, अमरावती 39.2, बुलडाणा 38.5, ब्रम्हपुरी 40, चंद्रपूर 39.8, गोंदिया 37.4, नागपूर 39.8, वाशिम 40, वर्धा 40, यवतमाळ 39.5़