विदेशी दारू बियरसह 3 लाखाचा मुद्देमाल जप्त

0

धुळे । मध्यप्रदेशातील बनावट विदेशी दारूसह बियरची तस्करी होत असल्याची खबर मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून हा साठा घेवून जाणारी जिप पथकाच्या हाती लागली. पोलिसांनी मद्यसाठ्यासह जिप जप्त केली असून शिरपूर तालुक्यातील एकवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एम.एच.18/डब्ल्यू-5528 ही गाडी रात्री 11.45 वाजता हॉटेल रेसिडेंन्सी पार्क येथे आली असता पोलिसांनी ती अडवून तीची तपासणी केली. गाडीमध्ये बियरच्या सिलबंद बाटल्यांचे 30 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता जिपचालक लक्ष्मण शोभाराम बंजारा (68)रा.जुनी सांगवी, ता.शिरपूर यांना निट उत्तरे देता न आल्याने पोलिसांनी 54 हजार रुपयांच्या बियरसह 2लाख 50 हजारांची जिप मिळून सुमारे 3 लाख 4 हजारांचा ऐवज जप्त केला. तसेच मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक चैतन्या एस., अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडीचे सपोनि जयंत शिरसाठ, विशेष पथकातील उपनिरीक्षक भास्कर शिंदे यांच्या पथकाने केली.

मालेगावकडे जात होता माल
मध्यप्रदेशातील सेंधवा येथून नाशिक जिल्ह्यातील मालेगावकडे बनावट विदेशी दारुसह बियर घेवून जिप जात असल्याची खबर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना काल मिळाली असता त्यांनी उपनिरीक्षक भास्कर शिंदे यांना माहिती देवून कारवाईचे आदेश दिले. याच वेळी महामार्गावर मोहाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ हे पेट्रोलिंग करीत होते. उपनिरीक्षक शिंदे यांनी त्यांच्या मदतीने पोहेकॉ प्रदिप सोनवणे, पो.ना.बिपीन पाटील, पोकॉ.मुकेश जाधव यांच्यासहज दोन पंच सोबत घेवून हॉटेल रेसिडेंसी पार्क येथे सापळा रचला.