विद्यमान खासदारांचा पत्ता कटचा ‘तो’ विषय गंभीर नाही

0

खासदार ए.टी. नाना पाटील यांचे पत्रकार परिषदेत माहिती

चाळीसगाव – गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली महानगरी थांब्याची मागणी पूर्ण झाली आहे. त्याचा आनंद मतदारसंघातील नागरिकांप्रमाणे मला देखील आहे. राष्ट्रवादीचे आमदारांनी विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार असल्याचे केलेले विधान गंभीर नाही. आम्ही विकासाचा आनंद घेत आहोत. राष्ट्रवादीच्या “त्या” आमदारांचे आमच्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांशी रोज बोलणे होते का ? हे मला माहीत नाही. मात्र आमदार उन्मेष पाटील व मी हातात हात घालून रेल्वे प्रवाशांसह मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यामुळे अजून तिकिटांच्या विषयांवर राष्ट्रीय असो वा राज्य पातळीवर बैठक नाही. म्हणून “तो” विषय गांभीर्याने घेऊ नका अशी कोपरखळी त्यांनी गेल्या पंधरवाड्यात राष्ट्रवादीच्या आमदारांनी विद्यमान खासदारांचा पत्ता कट होईल. असे विधान केले होते. या विधानाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार ए. टी. नाना पाटील यांनी सांगितले.

मंगळवार सकाळी सात वाजता महानगरी एक्सप्रेसला मिळालेल्या थांब्यासाठी आयोजित कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी त्यांनी
आज सायंकाळी ५ वाजता विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार उन्मेष पाटील, जि.प. सभापती पोपट भोळे, तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे उपसभापती संजय पाटील, विश्वास चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.