विद्यमान जि.प.सदस्यांकडुन कामगिरीचा लेखाजोखा तयार करण्यासाठी लगभबग

0

जळगाव। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या वार्‍यांना सध्या उत आले आहे. सर्वच राजकीय पक्षाकडुन निवडणुकीसंबंधी जोरदार तयारी सुरु आहे. राजकीय पक्षाकडुन निवडणुकीचे उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आले आहे. सर्वच पक्षांनी विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांना कमी प्रमाणात संधी दिली आहे. ज्या विद्यमान सदस्यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्या सदस्यांनी मागील पंचवार्षीक अंतर्गत मतदार संघात कोणते काम केले यासंबंधीचा लेखाजोगा मिळविण्यासाठी लगबग सुरु केली आहे. पाच वर्षात केलेल्या कामाची यादी घेऊन ही मंडळी निवडणुक प्रचारात उतरणार आहे. मागील कामाचा जोरावरच मतदारां समोर जाणार आहे. अनेक माध्यमातुन जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार कमी करण्यात आले असल्याने विद्यमान सदस्य निवडणुकीच्या उमेदवारीसाठी उत्सुक नव्हते. तसेच जे उत्सुक होते त्यांची तिकीट पक्षाकडुन कापण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षाने विद्यमान सदस्यांना जवळपास संधी दिलेली नसल्याचे दिसुन येत आहे.