विद्यानंद भवनमध्ये हिंदी दिन साजरा 

0
निगडी : येथील विद्यानंद भवन हायस्कुलमध्ये हिंदी दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुख्यध्यपिका छाया हब्बू यांचे हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रीती राणे यांनी हिंदी प्रार्थना मुलांकडून म्हणून घेतली. हिंदी राष्ट्रभाषेचे महत्व सांगितले.
यावेळी हिंदी राष्ट्रभक्ती, भावगीत गाण्याची स्पर्धा झाली, 30च्यावर मुला-मुलींनी भाग घेतला. विविधतेत एकता या संकल्पनेवर आधारित नृत्याविष्काराचे 9वीच्या मुलींनी सुंदर सादरीकरण केले. हर्ष काळभोर या छोट्या मुलाने स्वतः लेखन दिग्दर्शन करून छान नाटक सादर करून टाळ्यांची दाद मिळवली. सूत्रसंचालन प्रेरणा व्यास या विद्यार्थिनीने तर आभार देविका कुलकर्णीने व्यक्त केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन प्रीती राणे, रुपाली ठोंबरे, दिपाली वानखेडे यांनी केले. सच्चिदानंद संस्थेचे अध्यक्ष भरत चव्हाण पाटील, श्‍वेता भरत चव्हाण पाटील यांनी सर्वांचे कौतुक केले.