विद्यानगरात वृध्देची धूमस्टाईल 50 हजारांची मंगलपोत लांबविली

0

मंदिरात गेल्या होत्या पायी ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार

जळगाव – मंदिरातून घराकडे पायी परतत असतांना वंदना किरण खानावले वय 57 रा. पार्वतीनगर यांची गळ्यातील 15 ग्रॅमची 50 हजार रुपये किंमतीची गळ्यातील सोन्याची मंगलपोत दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी धुमस्टाईल लांबविल्याची घटना महाबळ परिसरातील विद्या नगरात सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी खानावले यांनी मंगळवारी पोलिसात तक्रार दिली आहे.

शहरातील पार्वतीनगर येथे वंदना खानावले ह्या प्लॉट नं 15 या ठिकाणी मुलगा अमोल खानावले यांच्या सोबत वास्तव्यास आहेत. अमोल खानावले हे बँकेत नोकरीला आहेत. महाबळ परिसरातील रामादास मंदिर येथे वंदना खानावले यांचा पाठ सुरु सुरु आहे. त्यासाठी त्या नियमित पार्वतीनगर येथून विद्यानगरातील रोटरी भवन मागील रस्त्याने पायी येत जात असतात. सोमवारी सकाळी वंदना खानावले मंदिरात सुरु असलेल्या पाठ साठी त्यांच्या वहिनी वासंती फाथे यांच्यासोबत गेल्या होत्या.

यापूर्वी या परिसरात घडली आहे घटना
रामदास मंदिरात पाठ आटोपून विद्यानगर रोटरी भवनच्या मागील रस्त्याने पायी येत असतांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी वंदना यांच्या गळ्यातील 15 ग्रॅमची 50 हजार रुपये किंमतीची मंगलपोत तोडून नेली. वंदना यांच्यासह त्यांच्या वहिनी वासंती यांनी यावेळी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. मंगळवारी खानावले यांनी नातेवाईक महिलेसोबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात प्रकाराबाबत तक्रार दिली.

पोलीसांनी सीसीटीव्ही तपासले
प्रकार माहिती मिळाल्यावर मंगळवारी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे रविंद्र पाटील, ज्ञानेश्‍वर कोळी, रुपेश ठाकरे यांनी वंदना खानावले यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी केली. यातील एका सीसीटीव्हीत दुचाकीवरील दोघे चोरटे कैद झाले आहेत, मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याची माहिती मिळाली आहे. दुचाकीवर आलेल्या चोरट्यांमध्ये मागे बसलेल्याने पोत लांबविली त्याने पिवळ रंगाचा, त्यावर काळे स्पॉट असलेला शर्ट घातलेला होता तर दुचाकी चालवित असलेल्याने राखी कलरचा कोट घातलेला असल्याचे वर्ण खानावले यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार पोलीस शोध घेत आहेत.