फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयातील प्रकार
फैजपूर- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात जिल्हास्तरीय विष्कार 2018 चे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. आविष्कार कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार जात असतांना धनाजी नाना महाविद्यालय प्रवेश द्वाराजवळ प्रवेश नाकारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार धनाजी नाना महाविद्यालयात घडल्याने पत्रकार या बाबीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठस्तरीय धनाजी नाना महाविद्यालयात जिल्हास्तरीय ‘आविष्कार 2018’ चे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातून जवळपास 900 विद्यार्थी सहभागी होणार असल्याने कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार जात असतांना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रवेश नाकारण्यात आला. एनसीसीचे विद्यार्थी पत्रकारांना पत्र दाखवा तरच आत जात येईल, असे सांगत होते. पत्रकारांचे ओळखपत्र पाहण्याचा या विद्यार्थ्यांना अधिकार कोणी दिला? आधीच पत्रकारांना आमंत्रण पत्रिका नसून एक व्हॉट्सअॅपच्या एसएमएस हजर पत्रकार उपस्थित होते. आपल्या परीरसरातील महाविद्यालयात इतका मोठा कार्यक्रम होत असल्याने त्याचा अभिमान म्हणून पत्रकार जातीने हजर होते.
बसण्यासाठी पत्रकारांना स्वतंत्र बैठक व्यवस्था नाही
व्हॉट्सअॅपच्या एका एसएमएसने हजर असलेल्या पत्रकारांना स्वतंत्र बैठक व्यवस्थादेखील सुद्धा या ठिकाणी करण्यात आली नव्हती. काही पत्रकारांना ज्या ठिकाणी जागा मिळेल तिथे बसून ते वृत्तांकन करत होते. एकंदरीत विद्यापीठस्तरीय आयोजित अविष्कार 2018 कार्यक्रमाला पत्रकारांना आपला अपमान सहन करावा लागल्याने त्यांच्यातून तीव्र नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला.