शेंदुणी : येथील गरुड महाविद्यालयातील खेळाडू सुनिल राठोड (तृतीय वर्ष कला) राहणार मोराड यांची निवड कबड्डी संघात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्तरीय स्पर्धेत झाली. या स्पर्धा जय नारायण व्यास विद्यापीठ जोधपूर महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांचा उपयोग करुन व तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शनाने खेळाडूना यश मिळविण्यास मदत होते. खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन संजयरावजी गरुड व माजी जि.प.सदस्य सागर जैन, संस्थेचे सचिव दिपक गरुड, माजी प.स.सदस्य सुधाकरअण्णा बारी, प.स.सदस्य शांतारामबापू गुजर, अविनाश निकम, नबीशहा, विठ्ठल फासे व महाविद्यालयाचे प्रा.डॉ.एस.डब्ल्यू.भोळे व शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना प्रा.महेश आर.पाटील व प्रा.आर.जी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.