विद्यापीठाच्या आवारात बहिणाबाईंचा पुतळा बसविण्याची मागणी

0

निसर्गकन्या बहिणाबाई जयंतीनिमित्त अभिवादन
बहिणाबाई उद्यानात सामूहिकरित्या कवितांचे सादरीकरण
जळगाव । निरक्षर राहूनही जीवनाचं तत्वज्ञान जगाला आपल्या कवितेद्वारे सांगणार्‍या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या 139व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, जिल्हा सांस्कृतिक व साहित्य मंचातर्फे बहिणाबाई उद्यानात सकाळी अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष, कलावंत आणि कवी तुषार वाघुळदे यांनी पाहुणे आमदार राजुमामा भोळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील आणि साहित्यिकांचे स्वागत केले.

आमदार भोळे म्हणाले की, आज ही जयंती सर्वत्र उत्साहाने साजरी होत असून विद्यापीठालाही या थोर कवियित्रीचे नाव शासनाने दिले, ही बाब भूषणावह आहे, तर प्रास्ताविकात कवी तुषार वाघुळदे म्हणाले, बहिणाबाईंच्या साहित्याने समाजाला प्रेरणा, उभारी दिली. त्यांचे साहित्य हे अक्षर साहित्य असून त्या लोककवियित्री होत्या. एक अहिव लेणं त्यांनी निर्माण केले, तर प्रदीप भोळे (बंडू) यांनी सांगितले की, त्यांच्या कवितेला वास्तवतेची किनार लाभलेली आहे. विद्यापीठाच्या आवारात आणि प्रवेशद्वाराजवळ बहिणाबाईंचा पुतळा बसविण्यात यावा, अशी मागणी उपस्थित साहित्यप्रेमी आणि पदाधिकार्‍यांनी केली.

याप्रसंगी कवयित्री बहिणाबाईंची अरे संसार संसार …!! ही कविता सर्वांनी सामूहिक स्वरूपात उत्कृष्टरित्या सादर केली ,मान्यवर आणि साहित्यिकांनी पुतळ्यास पुष्पांजली वाहिली. या कार्यक्रमास अ.भा. लेवा पाटीदार महासंघाचे महानगराध्यक्ष निखिल रडे, लेखक गोविंद पाटील, लेवा पाटीदार जेष्ठ नागरिक संघाचे आर.एस.सावदेेकर, डी.यू. भोळे, लेखिका इंदिरा जाधव, कवी तुषार वाघुळदे, अशोक पारधे, मजीद झकेरीया शैलेंद्र पाटील, संदीप भोरटक्के, सुनील महाजन, सतीश महाजन, भूषण महाजन, शुभम चिरमाडे, वैभव राणे, भावेश पाचपांडे, गणेश कोल्हे, धवल वाघुळदे, नेहा राणे, हरीश जावळे, निलेश ढाके, रोहित महाजन, अंकिता झोपे, निलेश कंकरे, नितीन सपकाळे आदी उपस्थित होते. जयंतीनिमित्त बहिणाबाई उद्यान परिसरात सुंदर रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या, सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी तर आभार प्रदीप (बंडू) भोळे यांनी मानले.