विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेच्या अनुदानात वाढ

0

पुणे । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कमवा व शिका योजनेच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे या योजनेची महाविद्यालयांना देण्यात येणार्‍या अनुदानाच्या रक्कमेतही वाढ करण्यात आली आहे. त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहे.

पुणे विद्यापीठाने गेल्या वर्षी कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांना प्रतितास 30 रुपयांवरून 45 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या कार्यवाही होत आहे. विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ असली तरी महाविद्यालयांना या योजनेतून दिल्या जाणार्‍या निधीत वाढ करण्यात आली आहे. मात्र त्याबाबतची स्पष्टता महाविद्यालयांना नव्हती. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने सविस्तर परिपत्रक जाहीर केले आहे. महाविद्यालयात 1 ते 500 विद्यार्थी या योजनेत सहभागी असतील, त्या महाविद्यालयांना 75 हजार रुपये अनुदान विद्यापीठाकडून मिळणार आहे. त्याचप्रमाणे 500 ते 1,000 विद्याथी असतील, त्या महाविद्यालयांना दीड लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.