विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात 32 हजार पदवीधारकांना होणार पदवी बहाल

0

जळगाव। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा पंचविसावा पदवीप्रदान समारंभ शनिवारी 8 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 9.30 वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात समारंभाचे आयोजन करण्यात आले असून समारंभासंबंधी सर्व तयारी विद्यापीठ प्रशासनातर्फे पुर्ण करण्यात आली आहे. यावर्षी खान्देशातील 32 हजार 161 पदवीधारकाला पदवी बहाल करण्यात येणार आहे. दीक्षांत समारंभासाठी आण्विक शास्त्रज्ञ म्हणून ओळख असलेले मुंबई येथील रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. अशी माहिती कुलगुरु पी.पी.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परीखा नियंत्रक धनंजय गुजराधी, कुलसचिव ए.बी.चौधरी, यु.व्ही.बोरसे, जनसंपर्क अधिकारी सुनिल पाटील उपस्थित होते.

21 हजार विद्यार्थ्यांना पदवी
यावर्षी कला शाखेच्या 9 हजार 687, मानसनीति1 हजार 443, विज्ञान 8 हजार 506, विधी 249, औषधनिर्माणशास्त्र 678, अभियांत्रिकी 4 हजार 843, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे 5 हजार 577, शिक्षणशास्त्र 1 हजार 160 विद्यार्थ्यांना पदवी मिळणार आहे. गुणवत्ता यादीतील 79 विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. यात 128 पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील एम.टेकच्या 18 विद्यार्थ्यांना पदवी दिली जाणार आहे. 21 हजार 242 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे प्रमाणपत्रावर आधार क्रमांक असणार आहे.

समावेशी शिक्षण संसाधनात समावेश: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत समावेशी शिक्षण संसाधन केंद्र सुरु करण्यात येत असून 8 रोजी या केंद्राचे उद्घाटन डॉ.ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते होणार आहे. मध्यवर्ती ग्रंथालयात अर्थात ज्ञानस्त्रोत केंद्राच्या इमारतीत हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या केंद्राद्वारे सर्व प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्रात चार समावेशी शिक्षण संसाधन केंद्रे असुन यात विद्यापीठाचा समावेश आहे.

जावडेकरांचे नियोजन रद्द
दीक्षांत समारंभासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना निमंत्रीत करण्यात येणार होते. त्यांना निमंत्रण देखील पाठविण्यात आले होेते. परंतु 6 ते 14 एप्रिल दरम्यान शासनातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने पंतप्रधानांच्या आदेशान्वये केंद्रीय मंत्र्यांना त्या कार्यक्रमांना हजेरी लावावयाची आहे. त्यामुळे जावडेकरांचे नियोजन रद्द झाले आहे. विद्यमान कुलगुरुंनी त्यांच्या कार्यकाळात होणार्‍या सर्व दीक्षांत समारंभासाठी वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवरांना बोलविण्याचा संकल्प केला आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती असणार आहे.