विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा पेपर तपासणीतील हलगर्जीपणा उघड

0

अभाविपची संबंधितांवर कारवाईची मागणी ः पुनर्मुल्यांकन तपासणीत विद्यार्थ्यांचे शून्य गुणांवरून झाले 51 गुण

जळगाव- नोव्हेंबर 2018 च्या पुनर्मुल्यांकन (रिचेकिंग) परीक्षेचा निकाल दि 25 व 27 फेब्रुवारी तसेच दिनांक 05,13,15 मार्च, व 10 एप्रिल 2019 रोजी विद्यापीठाच्या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मध्ये विविध विषयात 50% पर्यंत विद्यार्थ्यांच्या निकालात बदल होऊन विद्यार्थी पास झाले आहेत. विशेष म्हणजे शून्य गुण देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनात 51 गुण असल्याचे सिध्द झाले असून याव्दारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा पेपर तपासणीत हलगर्जीपणा उघड झाला आहे. संबंधित प्राध्यापकांवरर सात दिवसात कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन येईल असा इशारा आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे देण्यात आला आहे.

पुनर्मुल्यांकनात शून्या वरुन 51, 40 ने वाढले
एवढ्या मोठ्या प्रमाणात पुनर्मुल्यांकन निकालात झालेल्या बदलामुळे पेपर तपासणी कश्या प्रकारे होत असेल असा प्रश्न निर्माण होत आहेत. या नुसार शून्य गुण प्राप्त असणार्‍या बैठक क्र.351065 -40 गुण, बैठक क्र.331272 – 51 गुण व बैठक क्र.347934 -18 गुण चे 40 आशा प्रकारे गुणां मध्ये बदल झालेला आहे.या पूर्वी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकन तपासणीत झालेल्या गुण वाढी संदर्भात निवेदन देण्यात आले होते. परंतू विद्यापीठाणे कोणत्याही प्रकारची पेपर तपासणीत खबरदारी घेतली नसल्याचे यातून दिसून येते व यामुळे पुनर्मुल्यांकन (रिचेकिंग) तपासणी, फोटोकॉपी या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक, आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असल्याचे दिसून आले आहे.

अभाविपचे शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटले
पुनर्मुल्यांकन मध्ये गुण वाढणार्‍या विद्यार्थ्यांना 50% पुनर्मुल्यांकन शुल्क कोणत्याही प्रकारचे अर्ज न करता परत मिळावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकन निकाल वेळेत न लागल्या कारणास्तव त्याच पेपर साठी सेमिस्टर फॉर्म भरलेला अशा विद्यार्थ्यांना सेमिस्टर शुल्क परत करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल व कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे. पेपर तपासणीत हलगर्जीपणा करणार्‍या प्राध्यापकांवर सात दिवसात कारवाई केली नाही तर अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे.

पुनर्मुल्यांकनमध्ये पास विद्यार्थी 341
पुनर्मुल्यांकन बदल न झालेले विद्यार्थी 460
एकूण पुनर्मुल्यांकन साठी अर्ज दाखल करणारे विद्यार्थी 801