जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परिसर हे निसर्गरम्य वातावरणांनी नटलेले आहे. विद्यापीठाचे सौदर्य टिकून रहावे यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्न करीत असते. सध्या विद्यापीठात जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारा व्यतिरिक्त बांभुरीहून टाकरखेडा कडे जाणारा व टाकरखेड्याहून बांभुरीकडे येणारे दोन मार्गासह इतर मार्ग आहे. विद्यापीठात नित्यनियमाने येणार्यांच संख्याही मोठी आहे. विद्यापीठात निसर्गरम्य वातावरण असल्याने अनेकवेळा शैक्षणिक कामाव्यतिरिक्त विद्यापीठात येणार्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. ही घटना लक्षात घेता विद्यापीठाने मुख्यप्रवेशद्वारा व्यतिरिक्त असलेले सर्व रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुठे आता विद्यापीठात येण्याचा व जाण्याच्या एकमेव रस्ता मुख्यद्वार असणार आहे. यासंबंधी विद्यापीठाने परिपत्रक जारी केले आहे. 1 जून पासून हा निर्णय घेण्यात आला आहे.