विद्यापीठात डॉ. वडनेरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

0

जळगाव। पत्रकारितेतील कौशल्य आणि तंत्र आत्मसात करण्यासाठी लेखनातील सातत्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील व्यावहारिक अनुभव महत्त्वाचा ठरतो असे प्रतिपादन माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विद्यापीठाचे माजी अध्यक्ष प्रा. कमल दीक्षित यांनी डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी केले. वडनेरे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. पी.पी.पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रा. कमल दीक्षित भोपाळ, बीसीयुडी संचालक प्रा. पी.पी. माहुलीकर, प्र. कुलसचिव प्रा. अं.बा. चौधरी, डॉ. सुधीर भटकर, जनसंपर्क अधिकारी सुनिल पाटील, दिलीप बोरसे आदी उपस्थित होते.

पत्रकारिता क्षेत्राचे आकर्षण विद्यार्थ्यांबरोबर सर्वसामान्यांनाही
याप्रंसगी प्रा. कमल दीक्षित यांनी स्पष्ट केले की, पत्रकारिता क्षेत्राचे आकर्षण विद्यार्थ्यांबरोबर सर्वसामान्यांनाही आहे. बातमी लिहिण्याची आवड असणार्‍या आणि करिअर करणार्‍या विद्यार्थ्यांना पत्रकारितेच्या अभ्यासकांना डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे वृत्तलेखन आणि संपादन या क्षेत्रात निश्चित मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.