विद्यापीठात परिसर मुलाखतीत तीघांची युपीएल कंपनीत निवड

0

जळगाव। उमवितील स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसच्या् तीन विद्यार्थ्यांची निवड युनायटेड फॉस्फरस लि.(युपीएल) कंपनीतर्फे झाली. एम.एस्सी. पेस्टीसाईडस् आणि अ‍ॅग्रो केमिकल्स दरवर्षी युनायटेड फॉस्फरस लि. परिसर मुलाखतीचे आयोजन करते. या वर्षी देखील 2017 मध्ये उत्तीर्ण झालेल्या एम.एस्सी. पेस्टीसाईडस् अ‍ॅण्ड अ‍ॅग्रोकेमिकल्स् विषयासाठी द्विस्तरीय मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.

उमेश भोई, रोहित नाना पाटील आणि रोहित हिम्मतराव पाटील या तिघांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना वार्षिक तीन लाख रुपये वेतन देण्यात येणार आहे. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रा.डी.जी.हुंडीवाले, केमिकल सायन्सेस् प्रशाळेचे संचालक प्रा.डी.एच.मोरे, विभागप्रमुख डॉ.रत्नमाला बेंद्रे आणि प्राध्यापकांनी अभिनंदन केले. दरम्यान, याच वर्षी दोन विद्यार्थ्यांची क्रोडा प्रा.लि.आणि रोहा डायकेम प्रा.लि. या कंपन्यांमध्ये निवड झाली.