जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेतर्फे शनिवार, दि.13 ऑक्टोबर रोजी आठव्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर व रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा.जे.बी.नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.एस.टी.इंगळे, विभागातील प्राध्यापक, पदव्युत्तर तसेच पर्यावरण तंत्रज्ञान व संशोधक विद्यार्थी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.एस.बी.अत्तरदे यांनी प्रास्ताविक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी माजी विद्यार्थी मेळाव्याचे विद्याथ्र्यांना व संस्थेला असलेले महत्व यावर भर देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात ते म्हणाले की, माजी विद्याथ्र्यांचा अभिप्राय हा विद्याथ्र्यांसाठी तसेच संस्थेसाठी फार महत्वाचा असतो. माजी विद्यार्थी हे मोठया भावंडांप्रमाणे मार्गदर्शन करतात. परीक्षेतील गुणांना महत्व नसून चांगल्या कारकिर्दीसाठी पद्वतशीर प्रयत्न व माजी विद्याथ्र्यांची मदत या गोष्टी आवश्यक आहेत. प्रमुख पाहुणे प्रा.जे.बी.नाईक आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले की, विद्यार्थी जीवन संपून जेव्हा आपण वास्तव जगात पाऊल टाकतो तो काळ खरा आपली कसोटी घेणारा व खडतर असतो. अशा परिस्थितीत फक्त माजी विद्यार्थी हेच आपले खरे मार्गदर्शक व मदतनीस असतात. त्याच प्रमाणे शिक्षण संस्थेतील उणीवा दाखवण्याचे व त्यात दुरुस्त्या सुचवण्याचे अत्यंत मोलाचे काम माजी विद्यार्थी करु शकतात. प्रशाळेचे संचालक प्रा.एस.टी.इंगळे यांनी प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.व्ही.एम.रोकडे यांनी केले. के.पी.दांडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला व एम.बी.सावळे यांनी आभार मानले.