मुंबई । विद्यापीठाने तब्बल 35 हजार उत्तरपत्रिका गहाळ केल्या आहे. या उत्तरपत्रिकाचा शोध सुरू आहे, असे सांगून प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे यांनी त्याची कबुलीच दिली आहे. विद्यापीठाकडे 22275 उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी आल्या आहेत तसेच फोटो कॉपी 4920 आल्या आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रजेवर असल्याने माझी नियुक्ती झाली आहे. माझ्यावर फक्त विद्यापीठाचे निकाल लावणे ही जबाबदारी आहे, असे देवानंद शिंदे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकालाच्या गोंधळानंतर तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच विद्यापीठाकडून कुणीतरी माध्यमांसमोर आले. आता फक्त वाणिज्यचे आयडॉलचे निकाल बाकी आहेत, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.