मुंबई – मुंबई विद्यापीठातील बीफार्मच्या मुलांनी आपल्या प्रलंबित निकालाबाबत मागील आठवड्यात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या निवास्थानी ठिय्या केले होते. या ठिय्या आंदोलनाला यश आले असून बीफार्मच्या या 60 विद्यार्थ्यांचा पुढील उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर हे 60 विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी चंदिगढ येथे रवाना झाले असून त्यांच्या मुलाखती सुरु झाल्या आहेत.
मुंबई विद्यापीठाचे तृतीय वर्ष अभ्यासक्रमाचे जवळजवळ सर्वच निकाल प्रलंबित आहेत. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. याच विद्यार्थ्यांमध्ये बीफार्मच्या विद्यार्थ्याच्या तृतीय वर्षाचे निकाल देखील प्रलंबित असल्यामुळे देशातील नामांकित संशोधन संस्थेत त्यांना प्रवेश घेता येणार नव्हता. 17 जुलैला त्यांच्या प्रवेश प्रक्रियेची शेवटची तारीख आहे.
कुलगुरुंनी शब्द पाळला
विद्यापीठाने निकाल जाहीर केले नसते तर या 60 विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असते. मात्र या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आपला निकाल लावेल आणि आपण पुढे जाऊ याची वाट न पाहताच थेट विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या निवास्थानाजवळ 10 जुलै रोजी रात्री ठिय्या आंदोलन केले होते. विद्यार्थ्यांनी रात्री केलेल्या या आंदोलनामुळे अखेर कुलगुरुंची झोप मोड झाली आणि कुलगुरूंनी पुढील 7 दिवसात या 60 विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार या 60 विद्यार्थ्यांचे निकाल लागले असून हे विद्यार्थी पुढील एम ए च्या शिक्षण साठी चंदिगढयेथील विद्यापीठाकडे रवाना झाले असून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मुलाखती सुरु झाल्या आहेत.
आता प्रतीक्षा 30 जुलैची
बीफार्मच्या या 60 विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षकानाचा मार्ग मोकळा झाला असला तरी इतर विद्यार्थ्यांच्या भविष्याचे निकाल विद्यापीठाच्या कुलगुरच्या हाती आहे. इतर सर्व विद्यार्थ्यांचा निकाल 30 जुलै पर्यंत जाहीर करण्याचे आश्वासन विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिले आहेत. त्यामुळे आता सर्वानांच 30 जुलैच्या मोट्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
ऑनलाईनचा गोंधळ अद्याप जसाचा तास
30 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करायचे असे कुलुगुरूंनी म्हटले असले तरी तांत्रिकदृट्या तरी एवढ्या लवकर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणे अशक्य असल्याचे दिसते. कारण अद्याप पेपर तपासणीचा ऑनलाईन गोंधळ संपुष्ठात आलेला नाही.
त्याचबरोबर जर पेपर तपासणीत काही चुका आढळल्या ( जर एखाद्या विद्यार्थ्याला 10 पैकी 8 गुण द्यायचे झाल्यास आणि त्याला 6 गुण दिले असल्यास त्यात 2 गुण अधिकचे वाढवण्यासाठी) तर त्या चुका दुरुस्तीसाठी देण्यासाठी बेंगलोरला पाठवावे लागत आहे. त्यामुळे बंगलोरला पाठवून पुन्हा ते मुंबईत येईपर्यंत वेळ होत असल्याने 30 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांचा निकाल लागणे अशक्य आहे.
रविवारीही पेपर तपासणी
30 जुलैच्या मुदत असल्याने विद्यापीठात पेपर तपासणीला वेगा आला असला तरी सिस्टम मध्ये गोंधळ असल्याने कितीही वेगात काम करायचे ठरवले तरी काम करणे शक्य होत नसल्याने शिक्षकही विद्यापीठाच्या कामकाजाला वैतागले आहेत. शिक्षकांवरील ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचेच आठवड्यातील सहा दिवस काम केल्यानंतरही शिक्षक रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील शिक्षक पेपर तपासताना दिसत आहेत. त्यामुळे शिक्षक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.