विद्यार्थिनींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0

विरार । श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट विरार, ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट, श्री मंगलमूर्ती मंदिर ट्स्ट, यशवंत केशव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, तारामती हरिश्चंद्र ठाकूर चँरीटेबल ट्रस्ट, वाघोलीचे श्री शनि मंदिर ट्रस्ट, बोळींज येथील स्वयंभू महादेव मंदिर ट्रस्ट तसेच अनेक सेवाभावी संस्थांमार्फत शाळकरी गरीब व गरजू विद्यार्थिनींना आरोग्यविषयक जनजागृती व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप शनिवारी करण्यात आले. विरार येथील वासंतीबाई विष्णु ठाकुर स्मारक विद्यालय, चंदनसार या ठीकाणी इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता समेळ व डॉ. उज्ज्वला जाधव, मराठी मालिकेतील कलाकार अमृता सकपाळ यांच्या उपस्थितीत स्वच्छतेबद्दल जनजागृती व सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.

लवकरच वाटपही करणार दहा हजार चप्पलांचे
येत्या काही दिवसांत तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थिनींना या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविणार आहोत. तीन लाख सॅनेटरी नॅपकीन व दहा हजार जोडी चप्पलांचे वाटप करणार असल्याचे काशीनाथ पाटील यांनी सांगितले. यावेळी वसई-विरार महानगर पालिका प्रथम महापौर राजीव पाटील, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशीनाथ पाटील, वसई महानगरपालिकेचे अनेक नगरसेवक उपस्थित होते.