विद्यार्थिनींना मार्गदर्शन

0

भोर । भोर पोलीस स्टेशनतर्फे भोलावडे येथील भोर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय विद्यार्थिनींना पोलीस स्टेशनच्या निर्भया पथका अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार तडाखे व पोलीस हवालदार औदुंबर अडवाल यांनी मार्गदर्शन केले.

समाजातील अनिष्ठ गोष्टींना फाटा देऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनिंनी स्वतःवर, करिअरवर लक्ष केंद्रित करावे, यात ज्या अडचणी येतील तेथे त्यांना निर्भया पथकाचा मदतीचा हात मिळेल, मुलींनी स्वतःला कमी न समजता चांगल्या लोकांच्या सहवासात रहावे, सुसंस्कृत व्यक्तिचीच संगत करावी, असा सल्ला देऊन 18 वर्षांखालील मुलामुलींनी कोणतीही वाहने चालवू नयेत, असे अवाहन उपपोलिस निरीक्षक नंदकुमार तडाखे यांनी केले. औदुंबर अडवाल यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका पुनम गडकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती वायदंडे, पोलीस शिपाई काटे यांच्यासह विद्यार्थिनी, शिक्षिका, शिक्षक उपस्थित होते.